मुंबई, 31 ऑगस्ट- भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. परंतु या प्रकरणाला आता नवीन वळण लागलं आहे. हा मृत्यू नसून हत्या असल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यानुसार गोवा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान आता अभिनेत्री आणि सोनाली फोगटची बिग बॉसमधील सह-स्पर्धक राखी सावंतने एक धक्कादायक दावा केला आहे. राखी सावंत आपल्या रोखठोक बोलण्यासाठी ओळखली जाते. ती कोणत्याही विषयावर बिनधास्त उत्तरे देत असते. नुकतंच सोनाली फोगटच्या मृत्यूबाबत राखीने मोठा खुलासा केला आहे.एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने मीडियाशी संवाद साधताना म्हटलं, ‘सोनाली पीए सुधीर सांगवानच्या प्रेमात होती. राखीच्या म्हणण्यानुसार, सोनालीने तिला सांगितलं होतं की, ती आपला पीए सुधीर सांगवानवर प्रेम करते. तिने आपल्या भावना त्याच्या समोर व्यक्तदेखील केल्या होत्या. राखी पुढे म्हणते, मला तो व्यक्ती एखाद्या आरोपीसारखा वाटत होता’. राखीने मीडियाशी बोलताना पुढे सांगितलं, ‘मला पहिल्या दिवसापासूनच सोनाली यांचा खून झाल्याचं वाटत होतं. आम्ही बिग बॉसमध्ये खूप चांगला वेळ एकत्र घालवला होता. तेव्हा आमच्यादरम्यान अनेक गोष्टींवर बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या लेकीवर आपला किती जीव आहे याबाबत सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर आपण आपला पीए सुधीर सांगवानवर प्रेम करत असल्याचंही सांगितलं होतं. आता त्या या जगात नाहीत तर मला या सर्व गोष्टी सांगणं योग्य वाटत नसल्याचंही राखीने म्हटलंय . **(हे वाचा:** Sonali Phogat: सोनाली फोगटच्या मृत्यूचा होणार उलगडा? CCTV गायब करणारा पोलिसांच्या ताब्यात ) तसेच राखीने म्हटलं, ‘मला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर धक्का बसला होता. परंतु मी त्यावेळी दुबईत होते. मला वाटत त्यांना न्याय मिळायला हवा. दोषींना शिक्षा व्हायला हवी . इतकंच नव्हे तर राखीने भाजप पक्षाला उद्देशून म्हटलं, सोनाली आपल्या पक्षावर फार प्रेम करत होती. आदर करत होती. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की, त्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या. मला तो व्यक्ती आधीच आरोपीसारखा वाटत होता आणि दुर्दैवाने हे खरं झालं’.राखी सावंतने असा धक्कादायक खुलासा केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.