मुंबई, 19 सप्टेंबर : मागच्या काही काळापासून मराठी सिनेसृष्टीतही बॉलिवूड प्रमाणेच वैविध्यपूर्ण विषयांवर सिनेमांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे मराठी कलाकरांच्या अभिनयाला वाव मिळत आहे. सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली लवकरच ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतच रिलीज झालं असून सोनाली यामध्ये नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या अवतारात दिसत आहे. अनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. ‘वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!’ अशी टॅगलाइन असलेलं हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘सुपरस्टार सिंगर’च्या स्पर्धकांनाही रानू मंडल यांच्या आवाजाची भुरळ, पाहा VIDEO
सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-2, क्लासमेट, मितवा, हंपी असे अनेक हिट सिनेमा तिनं दिले आहेत. ‘विक्की वेलिंगकर’ येत्या 6 डिसेंबर 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रानू मंडल यांनी लतादीदींच्या सल्ल्यानंतरही गायलं त्याचं गाजलेलं गाणं
‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या सिनेमाची नायिका ही या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ अशा बॉलिवूड सिनेमाचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनीच ‘विक्की वेलिंगकर’चं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, लोकीज स्टुडीओ आणि डान्सिंग शिवा प्रॉडक्शन यांनी केली आहे. IIFA Award : दीपिका, रणवीर, आलियासह ग्रीन कार्पेटवर दिसला बॉलिवूडकरांचा Swag ==================================================================== बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO