जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्रीची किडनी फेल; ऑपरेशनसाठी चाहत्यांकडे मागतेय मदत

क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्रीची किडनी फेल; ऑपरेशनसाठी चाहत्यांकडे मागतेय मदत

क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्रीची किडनी फेल; ऑपरेशनसाठी चाहत्यांकडे मागतेय मदत

तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. सोबतच तिनं एखाद्या किडनी डोनरची प्रतिक्षा करत असल्याचं देखील सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 जुलै**: ‘**क्राईम पेट्रोल’ (Crime Patrol) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनाया सोनी (Ananya Soni) हिच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही किडण्या फेल झाल्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. खरं तर सहा वर्षांपूर्वीच तिच्या किडण्या निकामी झाल्या होत्या. त्यापैकी एका किडणीचं ऑपरेशन तिनं केलं होतं. (Ananya Soni kidneys fail) गेली सहा वर्ष ती एकाच किडणीवर जगत होती. मात्र आता त्या किडणीत देखील खराबी जाणवत असल्यामुळे तिला उपचारासाठी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. सोबतच तिनं एखाद्या किडनी डोनरची प्रतिक्षा करत असल्याचं देखील सांगितलं. राजकारण नको रे बाबा! रजनीकांत यांनी पक्षच केला बरखास्त

जाहिरात

“माझी संकटं वाढतच चालली आहेत. सध्या आम्ही आर्थिक संकटात आहोत. माझ्या आईचा कपड्यांचा व्यवसाय होता. परंतु काही दिवसांपूर्वी दुनाकात आग लागली आणि लाखो रुपयांचं नुकसान झालं. त्यातच आता माझी किडणी फेल झाली. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.”  असा अनुभव अनाया सोनीनं सांगितला. अभिनेता सुनील शेट्टीची इमारत BMC ने केली सील, कारण ऐकून परिसरात खळबळ अनाया सोनी ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नामकरण या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती. आपल्या कॉमिक टाईमिंगसाठी ती प्रसिद्ध आहे. गेल्या काही काळात तिने ‘क्राइम पेट्रोल’, इश्क में मरजावन’, ‘सावधान इंडिया’, ‘अदालत’ या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात