• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राजकारण नको रे बाबा! रजनीकांत यांनी पक्षच केला बरखास्त

राजकारण नको रे बाबा! रजनीकांत यांनी पक्षच केला बरखास्त

रजनीकांत यांचा धक्कादायक निर्णय; राजकारणाला ठोकला कायमचा रामराम

 • Share this:
  मुंबई 12 जुलै: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राजकारणात पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी मक्कल मंद्रम या राजकीय पक्षाची सुरुवात केली होती. या पक्षाच्या माध्यमातून ते राज्यातील निवडणूकींमध्ये भाग घेणार होते. परंतु आता त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. त्यांनी आपला पक्ष बरखास्त करत त्याऐवजी रजनी रसीगर नरपानी मंदराम नावाची एक स्वयंसेवी संस्था सुरु आहे. या संस्थेच्या माध्यमातून आता ते जनतेची सेवा करणार आहेत. रजनीकांत यांनी एक पत्रक जाहीर करून ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. “मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा आणि राजकारणात सक्रिय होण्याच विचार केला होता. परंतु वेळ अशी होती की हे शक्य झालं नाही. भविष्यात राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्यामुळे रजनी मक्कल मंद्रम हे लोकांच्या हितासाठी फॅन चॅरिटी फोरम म्हणून काम करेल” अशी माहिती त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनातून दिली आहे. अभिनेता सुनील शेट्टीची इमारत BMC ने केली सील, कारण ऐकून परिसरात खळबळ पाहा अजय देवगणचा ढासू अंदाज; Bhuj: The Pride Of India ट्रेलर प्रदर्शित रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यापूर्वी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजकारणात एन्ट्री करणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
  Published by:Mandar Gurav
  First published: