क्रिकेटचं मैदान गाजवणारा युवराज सिंग मैदानाबाहेर त्याच्या रोमान्स आणि प्रेमासाठी चर्चेत होता. अनेक अभिनेत्री आणि मुलींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं पण शेवटी युवराजने बॉलीवू़ड अभिनेत्री हेजल कीचसोबत संसार थाटला. मूळची ब्राझीलची असलेल्या हेजल आणि युवराजने तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलं.
युवराजचं लग्न होईपर्यंत त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्यात दिपिका पदुकोनपासून बॉलीवूड अभिनेत्री किम शर्माचाही समावेश होता. युवराज इतकं इतर कोणत्याच खेळाडूचं नाव इतक्या अभिनेत्रींशी जोडलं गेलं नव्हतं.
मैदानाबाहेर प्रेम प्रकरणामुळे प्रकाशझोतात येणाऱ्या युवराजचे नाव अभिनेत्री नेहा धुपियासोबत जोडलं गेलं. त्यांना बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोफी चौधरी हिच्या कारमधून एकत्र जाताना पाहण्यात आलं होतं. त्याआधी काहीवेळा पार्टीतही दोघे एकत्र दिसले होते.
2010 च्या आयपीएलवेळी युवराज आणि आंचल कुमारच्या प्रेमाची चर्चा माध्यमात रंगली होती. त्यानंतर आंचलला बिग बॉसमध्ये एंट्री मिळाली होती. आंचलने दोघांमध्ये काहीतरी असल्याचं फेटाळून लावलं होतं. ती म्हणाली होती की, आम्ही दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखतो, चांगले मित्र आहोत पण आमच्यात अफेअर नाही.
भारताने 2011 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एका पार्टीत युवराज सिंग आणि अभिनेत्री अमिषा पटेल एकत्र दिसले होते. त्यावेळी दोघांच्या अफेअरची कुजबुज सुरु होती. ज्यावेळी ही बातमी अमिषा पटेलला समजली तिनेसुद्धा आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं सांगितलं होतं.
अभिनेत्री किम शर्मासोबत युवराजच्या प्रेम प्रकरणाची चर्चा मात्र जास्त झाली. दोघांना अनेकवेळा एकत्र पाहण्यात आलं. युवराजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर किमने केनियाच्या बिझनेसमनसोबत लग्न केलं.
बॉलीवूडमध्ये पदार्पणाच्या चित्रपटाने स्टार झालेल्या दीपिका पदुकोनचं त्यावेळी युवराजसोबत नाव चर्चेत होतं. तेव्हा दोघांमध्ये मेलद्वारे संवाद होत होता. त्यावेळी युवराजच्या वाढदिवसाला ती ऑस्ट्रेलियात पोहचली होती. त्यानंतर दोघांच्या प्रेमाची चर्चा झाली होती. पुढे वाचा… तब्बल साडे तीन वर्ष कॉफी डेटसाठी तरसला होता रोमान्स किंग युवराज सिंग
भारतीय संघाचा दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंगनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान यावेळी त्याची पत्नी हेजल कीच आणि त्याची आई शबनम सिंग यावेळी उपस्थित होत्या.
एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जाणारा युवी तरुणींमध्ये तेवढाच फेमस होता. मात्र आपल्या खऱ्या प्रेमाला मिळवण्यासाठी युवराजला तब्बल साडे चार वर्ष वाट पाहावी लागली.
युवराज आणि हेजल यांच्या पहिल्या भेटीनंतर हेजलनं तब्बल साडे तीन वर्ष युवराजला वाट पाहायला लावली. युवराजच्या सततच्या प्रयत्नांनंतरही त्याला एका कॉफी डेटला जाण्याची संधी मिळत नव्हती.
एका टिव्ही शोमध्ये युवराजनं याबाबत माहिती दिली होती. त्यानं सांगितले होते की, हेजलला कॉफी डेटवर विचारला असता, ती नेहमी त्याला नकार द्यायची. कधी कधी तर, ती हा बोलायची पण जेव्हा जायचे असेल तेव्हा तीचा फोन बंद असायचा किंवा ती युवराजचा फोनचा नाही उचलायची. यामुळं युवराज हैराण झाला होता.
त्याआधी युवराज आणि हेजल फेसबुक फ्रेण्ड होते. पण फेसबुकवरही त्याला हेजलकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. एवढेच नाही तर, युवराजनं एका लाखतीदरम्यान सांगितले होती की, हेजलनं फेसबुकवर त्याची फेंण्ड रिक्वेस्ट तब्बल तीन महिन्यांनंतर एक्सेप्ट केली होती.
त्यानंतर काही वर्षांनी त्याच्या मित्रांनी हेजल आणि युवराजची भेट घडवून आणली. नकार आणि होकारात अखेर 30 नोव्हेंबर 2016 रोजी दोघं लग्नबंधनात अडकले.