मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sonalee Kulkarni: वाळवंटात नाचायची हौस सोनाली कुलकर्णीला पडली महागात; अशी झाली अवस्था

Sonalee Kulkarni: वाळवंटात नाचायची हौस सोनाली कुलकर्णीला पडली महागात; अशी झाली अवस्था

 सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी

नुकताच सोनालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून याची चांगलीच चर्चा होत आहे. काय आहे नक्की या व्हिडिओमध्ये पाहू या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 जानेवारी :  मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. तिने मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील नाव कमावले आहे. आजवर तिने अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सोनाली सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ती तिचे लाईफ अपडेट्स देत असते शिवाय अनेक फोटो आणि व्हिडीओ सुद्धा चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच सोनालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून याची चांगलीच चर्चा होत आहे. काय आहे नक्की या व्हिडिओमध्ये पाहू या.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि डान्स कोरियोग्राफर फुलवा खामकरची मैत्री सगळ्यांनाच ठाऊक आहे. या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. सोनालीच्या बहुतेक चित्रपटातील गाणी ही फुलवाने बसवलेली असतात. ही गाणी चांगलीच हिट देखील होतात. या दोघी नेहमी एकमेकींसोबतचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मध्यंतरी या दोघींचा लंडन ब्रीजवरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता या दोघींचा अजून एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

हेही वाचा - Shahrukh Khan: 'पठाण' ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई! पाहून शाहरुख म्हणाला 'आता पुन्हा...'

सोनालीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि फुलवा चक्क वाळवंटात नाचताना दिसत आहेत. दोघीही श्रीदेवीच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत आहेत.  श्रीदेवी यांच्या ‘चुडिया खनक गयी’ या गाण्यावर सोनालीने ठुमके लगावले आहेत.  विशेष म्हणजे १० डिग्री तापमानात सोनाली व फुलवाने डान्स केला आहे.पण हा व्हिडीओ शूट करताना दोघींची अवस्था मात्र चांगलीच वाईट झाली. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सोनालीने याविषयी सांगितलं आहे.  हा व्हिडीओ दोघींनी राजस्थानमध्ये शूट केला आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करत सोनालीने म्हटलंय कि, 10 डिग्री तापमानामध्ये नाचायची हाऊस….अर्थात फिल्मी आहोत, डान्सर्स आहोत, श्रीदेवी फॅन्स आहोत आणि मॅड तर आहोच आहोत म्हणून 20-20 रिटेक पण केल्या, तोल जात होता…घसरत होतो, पडत होतो तरी मज्जा करत होतो…' दोघींचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून ते या पोस्टवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

सोनालीच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर ती नुकतीच 'व्हिक्टोरिया' या चित्रपटात झळकली आहे. तर तिने अजून एक यशाची पायरी चढली असून येणाऱ्या काळात ही अभिनेत्री आता मल्याळम चित्रपटात दिसणार आहे. सोनालीला आता मल्याळम चित्रपटात पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर झाले आहे. सोनाली कुलकर्णी येणाऱ्या काळात मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई' या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.

First published:

Tags: Marathi actress, Sonalee Kulkarni