मुंबई, 20 मार्च : सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कोरोना व्हायरस बद्दल बोलल जात आहे. या व्हायरसनं जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे कोणाही याबाबत रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी बसले आहेत. अनेक हॉलिवूड कलाकारांना या व्हायरसचं संक्रमण झालं आहे. पण काही महत्त्वाच्या कामासाठी मात्र लोकांना घराबाहेर पडणं भाग आहे. अशात मराठमोळा अभिनेता नुकताच अमेरिकेतून भारतात परतला. यावेळचा अनुभव त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेय वाघ अमेरिकेत गेला होता. तेथील कॅलिफोर्निया येथील परिस्थितीचे वर्णन त्याने केले आहे. अभिनेता अमेय वाघ अमेरिकेहून काल परत आला. कोरोना टेस्ट मुंबई विमानतळावर कशी झाली आणि सर्वांनी कशा पद्धतीने सहकार्य केलं याचं मीहिती त्यानं एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे. क्वारंटाईनचा शिक्का असल्यामुळे आता पुढील काही दिवस घरी बसणार असंही त्याने सांगितलं आहे. डॉक्टर्स, एअरपोर्ट स्टाफ, पोलिस, आर्मी या सर्वांचे त्याने मनापासून आभार मानले आहेत. अमेयनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घरकोंबडा अमेय असं फनी कॅप्शन दिलं आहे. गायिका कनिका कपूर Coronavirus पॉझिटीव्ह, 300 लोकांसोबत केली होती पार्टी
चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना व्हायरस (Coronavirus) आज जगभरात पसरला आहे. भारतात या व्हायरसचे जवळपास 170 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 4 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासाठी 22 मार्चला जनाता कर्फ्यूची हाक दिली आहे. जान्हवीनं केलं बहीण खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग, VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल दरम्यान बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र तिनं ही माहिती मागच्या काही दिवसांपासून लपवून ठेवल्याचा आरोप तिच्यावर केला जात असून सोशल मीडियावर कनिकाच्या अटकेची मागणी केली जात आहे. भारतात कोरोनाची लागण झालेली कनिका पहिली सेलिब्रेटी ठरली आहे. शिल्पा शेट्टीनं आता केली अभिनेता राजपाल यादवची धुलाई, पाहा VIDEO