मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'या' दिवशी रिलीज होणार सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा Double XL; टीझरने वाढवली उत्सुकता

'या' दिवशी रिलीज होणार सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा Double XL; टीझरने वाढवली उत्सुकता

महिलांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि आव्हानांना मोठ्या पडद्यावर साकारण्याचं काम बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरेशी करणार आहे.

मुंबई, 22 सप्टेंबर : एखाद्या स्त्रीची तब्बेत जास्त असेल तर त्यावरुन अनेक वेळा तिला ट्रोल केलं जातं. प्रत्येक वेळी तिला टोमेणे मारले जातात. त्यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि आव्हानांना मोठ्या पडद्यावर साकारण्याचं काम बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरेशी करणार आहे. 'डबल एक्सएल' या आगामी चित्रपटातून दोघीही महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करणार आहे. 'डबल एक्सएल' या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच टी-सिरीजच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महिलांच्या जास्त तब्बेतीविषयी, मैत्री आणि त्यांची स्वप्ने याविषयी पहायला मिळत आहे. व्हिडीओवरुन पहायला मिळतंय की या चित्रपटामुळे महिलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. शिवाय त्यांना त्यांच्या तब्बेविषयीही वाईट न वाटता आत्मविश्वासानं वावरता येईल. सध्या टी-सिरीजने शेअर केलेल्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हेही वाचा -  Koffee With Karan 7: शाहरुख खानच्या 'या' वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवते पत्नी गौरी; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य टी-सिरिजने हा व्हिडीओ शेअर करत लवकरच 'डबल एक्सएल' चित्रपट भेटीस येणार असल्याचं सांगितलं आहे. 14 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून आपल्याला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे सोनाक्षी आणि हुमा कुरेशीचे चाहते यासाठी खूप उत्सूक आहेत. या पोस्टवर अनेक कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram

A post shared by T-Series (@tseries.official)

दरम्यान, मुदस्सर अझीझ लिखित, सतराम रमाणी दिग्दर्शित या चित्रपटात खूप मस्तीही पहायला मिळणार आहे. याशिवाय अनेक मैत्री, महिलांची आव्हानं, स्वप्नही पहायला मिळणार आहे.
First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Sonakshi sinha, Upcoming movie

पुढील बातम्या