जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Koffee With Karan 7: शाहरुख खानच्या 'या' वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवते पत्नी गौरी; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Koffee With Karan 7: शाहरुख खानच्या 'या' वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवते पत्नी गौरी; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Koffee With Karan 7: शाहरुख खानच्या 'या' वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवते पत्नी गौरी; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

बॉलिवूड किंग शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर गौरी खान करण जोहरच्या टॉक शो ‘कॉफी विथ करण’ च्या 12 व्या एपिसोडमध्ये सहभागी झालेली दिसून आली.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 सप्टेंबर-  बॉलिवूड किंग शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर गौरी खान करण जोहरच्या टॉक शो ‘कॉफी विथ करण’ च्या 12 व्या एपिसोडमध्ये सहभागी झालेली दिसून आली. गौरीसोबत ‘फॅब्युलस लाइव्‍ह ऑफ बॉलिवूड वाइव्‍हज्’ फेम भावना पांडे आणि महीप कपूर देखील उपस्थित होते. महीप कपूर ही अभिनेता संजय कपूरची तर भावना पांडे ही अभिनेता चंकी पांडेची पत्नी आहे. हा एपिसोड सध्या प्रचंड चर्चेत आहे. गौरी खान 17 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मित्र आणि बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या शोमधून पडद्यावर परतली आहे. सोबतच तिने आपल्या खास मित्रांसोबत शोमध्ये धम्माल केली आहे. या तिघींनीआपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यावर संवाद साधला आहे. इतकंच नव्हे तर आपल्या पती आणि मुलांबद्दल अनेक रंजक खुलासेदेखील केले आहेत. या शोच्या रॅपिड-फायर राउंडमध्ये गौरी खानने बॉलिवूड किंग आणि पती शाहरुख खानच्या सर्वात वाईट सवयी उघड केल्या आहेत. या सवयी तिला आपल्या तिन्ही मुलांमध्ये अजिबात नको आहेत. होस्ट करण जोहरने गौरी खानला विचारलं की, शाहरुखच्या कोणत्या चांगल्या सवयी तिला तिच्या मुलांमध्ये ठेवायला आवडेल? यावर खुलासा करत गौरीने म्हटलं, “मला आनंद आहे की त्याच्याकडे अशी कोणतीही गुणवत्ता नाही ज्यामध्ये गुणवत्ता नाही. ते कधीही वेळेवर नसतात. आणि मुले मात्र वक्तशीर आहेत. आणि माझी मुले त्यांच्यासारखं बाथरुममध्ये 100 तास घालवत नाहीत. म्हणून मला आनंद आहे की या सवयी त्यांच्यामध्ये नाहीत."

News18

**(हे वाचा:** VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करतेय अमिषा पटेल? ‘या’ कारणामुळे होतेय चर्चा ) शाहरुखची पत्नी गौरी खानचं हे उत्तर ऐकून महीप आणि भावना करणसोबत हसायला लागतात. दुसरीकडे करणने तिला पुन्हा प्रश्न केला की, शाहरुख काय करतोय हे जाणून घेण्यासाठी तिला शाहरुखच्या बाथरूममध्ये कॅमेरा लावायचा आहे का? मात्र, त्यानंतर करण स्वतः सांगतो की, किंग खान त्याचा डाउनटाइम बाथरुममध्ये घालवतो.करणचं बोलणं ऐकल्यानंतर गौरीने खुलासा केला की, शाहरुखला टीव्ही पाहणं आवडतं आणि कधी-कधी बाथरूममध्ये बसून पुस्तके वाचायला आवडतात. शो दरम्यान गौरी खानने आपल्या पतीचं कौतुक केलं आहे. आणि सांगितलं की तो मल्टी टास्किंग आहे. त्यामुळे आमच्या मुलांना त्याच्यातील हा गुण मिळायला हवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात