मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सलमानचा राग अद्याप गेलेला नाही? विवेक ओबेरॉयला चित्रपटातून केलं बाहेर

सलमानचा राग अद्याप गेलेला नाही? विवेक ओबेरॉयला चित्रपटातून केलं बाहेर

 ‘रोझी: द सॅफरॉन चॅप्टर’ (Rosie The Saffron Chapter) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. या हॉररपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार होता. परंतु शूटिंगच्या काही दिवसांपूर्वीच त्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई 2 एप्रिल: विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवर रोमान्स, अ‍ॅक्शन, विनोदी, गँगस्टर अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळं प्रेक्षक त्याच्या ‘रोझी: द सॅफरॉन चॅप्टर’ (Rosie The Saffron Chapter) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. या हॉररपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार होता. परंतु शूटिंगच्या काही दिवसांपूर्वीच त्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता त्याच्या जागी सलमानचा (Salman Khan) भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) याची वर्णी लागली आहे. या पार्श्वभूमावर सलमान आणि विवेकमधील वाद अद्याप थांबलेला नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अवश्य पाहा - कादर खान यांच्या मुलाचं निधन; एअरपोर्टवर करत होता सिक्युरिटीचं काम

2000 च्या दशकात अभिनेत्री ऐश्वर्या रायवरुन सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. ऐश्वर्या आधी सलमानला डेट करत होती परंतु तिनं त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळं ब्रेकअप केलं असा दावा विवेकने केला होता. त्याच दरम्यान ती विवेकला डेट करत असल्याची चर्चा देखील होऊ लागली. यामुळं सलमान संतापला अन् त्यानं विवेकला फोन करुन धमकी दिली. मग संतापलेल्या विवेकने देखील एका मुलाखतीद्वारे सलमानला चक्क बॉक्सिंग मॅचचं आव्हान दिलं. तेव्हापासून सलमान आणि विवेकमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. या भांडणामुळं विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली असं म्हटलं जातं. रोझी चित्रपटाच्या निमित्तानं हा वाद आता पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे.

अवश्य पाहा - रस्त्यावर कपडे विकणारा कपिल शर्मा झाला सुपरस्टार; गरीब तरुणाचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार विशाल मिश्रा या चित्रपचटाचं दिग्दर्शन करणार आहे. विशाल आणि सलमानमध्ये खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळं सलमानच्या सांगण्यावरुनच त्यानं विविकला चित्रपटातून बाहेर काढलं अन् त्या जागी अरबाज खानची निवड करण्यात आली, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटातून श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

First published:

Tags: Movie release, Salman khan, Vivek oberoi