मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कादर खान यांच्या मुलाचं निधन; एअरपोर्टवर करत होता सिक्युरिटीचं काम

कादर खान यांच्या मुलाचं निधन; एअरपोर्टवर करत होता सिक्युरिटीचं काम

अब्दुल सिनेसृष्टीत कार्यरत नव्हता. मात्र त्याचे वडिल कादर खान यांचा फॅन फॉलोइंग जगभरात आहे. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांनी अब्दुलच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली जात आहे.

मुंबई 2 मार्च: दिवंगत अभिनेते कादर खान (Kader Khan) यांचा मोठा मुलगा अब्दुल कुद्दुस खान (Abdul Quddus) याचा मृत्यू झाला आहे. अब्दुल गेली काही वर्ष मूत्रपिंडाच्या आजारामुळं त्रस्त होता. बुधवारी उपचारादरम्यान कॅनडामधील रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. कॅनडामधील टोरंटो येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. (Abdul Quddus dies in Canada) अब्दुल सिनेसृष्टीत कार्यरत नव्हता. मात्र त्याचे वडिल कादर खान यांचा फॅन फॉलोइंग जगभरात आहे. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांनी अब्दुलच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली जात आहे.

अब्दुलला अभिनयाची आवड नव्हती. त्यामुळं अनेकदा त्याचं वडिलांसोबत भांडणही होतं असे. मात्र त्यानं कॅनडामध्ये एक नाटक कंपनी सुरु केली होती. कल के सुपरस्टार असं या कंपनीचं नाव होतं. परंतु या व्यवसायात तो अयशस्वी ठरला. शिवाय त्याला लाखो रुपयांचं नुकसानही झालं. परिणामी तो कॅनडा विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होता. दरम्यान त्याला मुत्रपिंडाचा आजार झाला. या आजावर त्याचे उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अवश्य पाहा - Rambo मधून टायगर श्रॉफला केलं बाहेर; आता हा अभिनेता होणार अ‍ॅक्शन हिरो

कादर खान यांचा दुसरा मुलगा आजरा खान हा बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. त्यानं तेरे नाम, मैंने दिल तुझको दिया आणि वॉण्टेड यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. शिवाय त्यानं अनेक चित्रपटांच्या पटकथा देखील लिहिल्या आहेत. तो देखील आपल्या कुटुंबासोबत कॅनडामध्येच राहात आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment