मुंबई 25 फेब्रुवारी: ‘स्लमडॉग मिलेनिअर’ (Slumdog Millionaire) या चित्रपटातून नावारुपास आलेला अभिनेता मधुर मित्तलविरोधात लैंगिक (Madhur Mittal) अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अभिनेत्याच्या एक्स गर्लफ्रेंडने हे आरोप केले आहेत. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Mumbai Police) 13 फेब्रुवारी रोजी त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला मारहाण केली असं या तक्रारीत म्हटलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार मारहाण करुन जखमी करणं, मानसिक आणि लैंगिक अत्याचार या आरोपांखाली मधुरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 11 फ्रेब्रुवारी रोजी अंतर्गत मतभेदांमुळं दोघांनी ब्रेकअप केलं. त्यानंतर दोन दिवसांनी मधुरनं घरात घुसून तिला मारहाण केली असा अरोप तरुणीच्या वकिलांनी केला आहे.
VIDEO: तरुणीला वेड लागलं कार्तिकचं; प्रपोज करण्यासाठी रात्रभर घरासमोर होती उभी
त्या दिवशी मधुर प्रचंड रागात होता. कोणाशीही न बोलता तो थेट पीडितेच्या घरात शिरला आणि त्याने पीडितेची मान पकडून तिच्या कानशिलात लगावल्या. तसंच तिचे केस, कान ओढले. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असे आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Crime news, Madhur mittal, Mumbai police, Sexual assault