मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: तरुणीला वेड लागलं कार्तिकचं; प्रपोज करण्यासाठी रात्रभर घरासमोर होती उभी

VIDEO: तरुणीला वेड लागलं कार्तिकचं; प्रपोज करण्यासाठी रात्रभर घरासमोर होती उभी

एका तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही तरुणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्तिकच्या घरासमोर तासंतास उभी होती. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

एका तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही तरुणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्तिकच्या घरासमोर तासंतास उभी होती. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

एका तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही तरुणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्तिकच्या घरासमोर तासंतास उभी होती. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

मुंबई 25 फेब्रुवारी: कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. क्यूट स्माईल आणि रोमँटिक अंदाजाच्या जोरावर चाहत्यांना घायाळ करणारा हा अभिनेता जणू तरुणींच्या गळ्यातील ताईतच झाला आहे. देशभरातील हजारो तरुणी त्याला सोशल मीडियाद्वारे प्रपोज करतात. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही तरुणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्तिकच्या घरासमोर तासंतास उभी होती. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. (Kartik Aaryan Video, Viral Video)

फिल्मी ज्ञान नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये एक तरुणी गुडघ्यावर बसून कार्तिकला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. हे दृश्य पाहून कार्तिक देखील अवाक् झाला. त्यानं त्या तरुणीशी बोलून तिची समजूत काढली व एक सेल्फी काढून तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या तरुणीच्या धाडसाचं कौतुक देखील केलं आहे.

हृतिक रोशनला 'या' वेब सीरिजसाठी 75 कोटींची ऑफर; मात्र केला नाही स्वीकार!

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. त्यानं 2011 साली ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘आकाशवाणी’, ‘कांची द अनब्रेकेबल’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘गेस्ट इन लंडन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटामुळं तो खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. येत्या काळात तो ‘भूलभूलैया 2’ या चित्रपटात झळकणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Instagram post, Kartik aryan, Love, Proposal, Shocking viral video, Social media