जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पहिल्या पत्नीला न सांगताच उदित नारायण यांनी केलं होतं दुसरं लग्न आणि...

पहिल्या पत्नीला न सांगताच उदित नारायण यांनी केलं होतं दुसरं लग्न आणि...

पहिल्या पत्नीला न सांगताच उदित नारायण यांनी केलं होतं दुसरं लग्न आणि...

बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांना आवाज देणाऱ्या उदित नारायण यांचं खासगी आयुष्य सुद्धा तेवढंच रोमँटिक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 डिसेंबर : 1898 मध्ये आलेला आमिर खानचा सिनेमा ‘कयामत से कयामत तक’मधील ‘पापा कहते हैं…’ हे गाणं गाऊन सर्वांच्या मनावर राज्य करणारे गायक उदित नारायण यांचा आज 64 वा वाढदिवस. बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांना आवाज देणाऱ्या उदित नारायण यांचं खासगी आयुष्य सुद्धा तेवढंच रोमँटिक आहे. त्यांच्या पर्सनल लाइफ बद्दल अनेक चर्चाही त्या काळी झाल्या. यातील एक किस्सा त्यांच्या लग्नाशी संबंधित आहे. उदित नारायण यांनी दोन लग्नं केली आहेत. त्यांनी पहिलं लग्न रंजाना झा यांच्याशी केलं. त्यानंतर दुसरं लग्न दीपा नारायण यांच्याशी केलं. गायक आदित्य नारायण हा उदित आणि दीपा यांचा मुलगा आहे. उदित यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता आणि त्यांना कोणतीही कल्पना न देता दीपा यांच्याशी लग्न केलं त्यावेळी त्यांच्या नावाची बरीच चर्चा झाली. ती माणसं नसून सैतान, हैदराबाद गँग रेप प्रकरणावर सलमान संतापला सुरुवातीला उदित यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रंजना झा यांनी कोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात उदित यांच्याशी झालेल्या लग्नाचे फोटो आणि कागदपत्र सादर केली. त्यानंतर उदित यांनी रंजना झा यांच्याशी त्यांचं लग्न झाल्याचं मान्य केलं. त्यावेळी कोर्टानं त्यांना दोन्ही पत्नींना सोबत ठेवण्याचे आदेश दिले होते. असं म्हटलं जातं की त्यांनी दिपा यांच्याशी लग्न करताना रंजना यांना याची कोणतीही कल्पना दिली नव्हती. नेपाळी गाण्यानं केली होती करिअरची सुरुवात गायक उदित नारायण यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 मध्ये झाला. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सिंदूर या सिनेमातून केली होती. हा एक नेपाळी सिनेमा होता. 1978 मध्ये ते मुंबईला आले. त्यानंतर 1980मध्ये त्यांना पहिल्यांदा सिनेमात गाण्याची संधी मिळाली. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’मधून या सिनेमात त्यांनी ‘पापा कहते हैं…’ हे गाणं गायलं होतं. या गाण्यासाठी त्यांना बेस्ट सिंगरचा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला. VIDEO : …आणि स्टेजवर पोहोचल्यावर रानू मंडल चक्क गाणंच विसरल्या! उदित नारायण यांना 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या गाण्यांसाठी त्यांना 3 वेळा बेस्ट सिंगरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. याशिवाय त्यांना फिल्म फेअरचे 5 अवॉर्ड मिळाले आहेत. ज्यात ‘कयामत से कयामत तक’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘आशिकी’, ‘लगान’ या सिनेमांचा समावेश आहे. ‘या’ कारणासाठी जान्हवी कपूर स्वतःला मानते अंधश्रद्धाळू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात