मुंबई, 30 नोव्हेंबर : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाशझोतात आलेली सिंगर रानू मंडल मागच्या काही दिवसांपासून एका चाहतीवर रागवल्यानं चर्चेत आली आहे. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. एवढंच नाही तर बॉलिवूडचा स्टार प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानंही त्यांना त्याच्या सिनेमात गाण्याची संधी देऊ केली. त्यानंतर त्यांना आता अनेक शोमध्ये गेस्ट म्हणून बोलावलं जात आहे. अशाच एका शोमधला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात स्टेजवर जाऊन रानू मंडल या गाणं विसरलेल्या दिसत आहेत. याशिवाय चुकीच्या पद्धतीनं इंग्रजी बोलल्यानं त्यांना ट्रोल केलं जात आहे. रानू मंडल यांनी नुकतीच बरखा दत्त यांच्या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी बरखा यांनी त्यांना एक गाणं गाण्याची विनंती केली. त्यावर रानू म्हणाल्या मी हिमेशजींसोबत गायलेलं गाणं गाते. बरखा यांनी त्यांना संमती दर्शवली. गाणं गाण्यासाठी रानू मंडल यांनी माइक हातात घेतला पण त्यांना गाणं काही केल्या आठवेना. काही वेळ त्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्या म्हणल्या, ‘ओह माय गॉड मी विसरले.’ पण त्यांनी यावेळी केलेला इंग्रजीतील उच्चारही चुकीचे होते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. OMG : गौरी खाननं सांगितले चक्क सुपरस्टारची पत्नी असण्याचे तोटे
काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात रानू मंडल त्यांच्यासोब सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होती मात्र रानू मंडल यांनी तिला नकार देत तिच्याशी रागानं बोलताना दिसल्या. त्यांच्या हा व्हिडीओ व्हायरल होऊन काही काळ लोटला नाही तोवर त्यांच्याशी बोलायला आलेल्या पत्रकार आणि पॅपराजींनाही त्या टाळताना दिसल्या. त्याचं हे वागणं पाहता त्यांना आतापर्यंत मिळालेल्या यशाचा गर्व झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. Bigg Boss : शहनाझ गिलनं स्वतःला म्हटलं कॅरॅक्टरलेस आणि…
रानू मंडल यांच्याबद्दल बोलायचं तर रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. रानू मंडल यांचं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. याशिवाय याच सिनेमासाठी त्यांनी आणखी दोन गाणी गायली आहेत. ट्रेनमधून प्रवास करताना बॉलिवूड अभिनेत्याची झाली अशी अवस्था, पाहा VIRAL VIDEO

)







