‘या’ कारणासाठी जान्हवी कपूर स्वतःला मानते अंधश्रद्धाळू

‘या’ कारणासाठी जान्हवी कपूर स्वतःला मानते अंधश्रद्धाळू

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आगामी सिनेमाबद्दल बोलताना जान्हवीनं स्वतःला अंधश्रद्धाळू म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं मागील वर्षी ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिचा कोणताही कोणताही सिनेमा रिलीज झालेला नाही. पण ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. लवकरच जान्हीवीचे एकामागोमाग एक 2 सिनेमे रिलीज होत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिनं तिचा आगामी सिनेमा रूही आफ्जाचं शूटिंग सूरू केलं. पण जान्हवीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःबद्दल एक नवा खुलासा केला ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आगामी सिनेमाबद्दल बोलताना जान्हवीनं स्वतःला अंधश्रद्धाळू म्हटलं आहे. ती म्हणाली, माझ्या सिनेमाचं शूटिंग खूप चांगलं चाललं आहे. तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणा किंवा जून्या विचारांची. मला वाटतं की, मी जर माझ्या सिनेमाबाबत जास्त बोलेन तर माझ्या सिनेमाला नजर लागेल असं मला वाटतं.

Bigg Boss : शहनाझ गिलनं स्वतःला म्हटलं कॅरॅक्टरलेस आणि...

 

View this post on Instagram

 

💭🌈

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी पुढे म्हणाली, या कारणासाठी मी माझ्या सिनेमांबाबत जास्त बोलणार नाही. या सिनेमाचा भाग असणं आणि या सिनेमातील इतर कलाकारांसोबत काम करणं यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. रूही-अफ्जा या सिनेमात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. हा एक हॉरर आणि कॉमेडीचं मिश्रण असलेला सिनेमा आहे. या दोघांव्यतिरिक्त फुकरे फेम अभिनेता वरुण शर्मा सुद्धा या सिनेमामध्ये दिसणार आहे. पुढील वर्षी म्हणजे, 20 मार्च 2020 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

ट्रेनमधून प्रवास करताना बॉलिवूड अभिनेत्याची झाली अशी अवस्था, पाहा VIRAL VIDEO

 

View this post on Instagram

 

🕡🕟🕖🕙

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

याशिवाय जान्हवी गुंजन सक्सेनाचा बायोपिक सिनेमा ‘कारगिल गर्ल’मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच धर्मा प्रोडक्शनच्या तख्तमध्येही तीची महत्त्वाची भूमिका आहे.

सिनेमांमध्ये सेलिब्रेटींनी वापरलेल्या कपड्यांचं नंतर काय होतं, घ्या जाणून

Published by: Megha Jethe
First published: November 30, 2019, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading