मुंबई, 15 नोव्हेंबर : प्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांच्या गाण्याचा, संगीताचा प्रचंड चाहता वर्ग आहे. सलील यांनी ‘आयुष्यावर बोलू काही’ ( या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्याचसोबत त्यांनी दर्जेदार चित्रपट निर्माण केले आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'एकदा काय झालं' या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं होतं. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच भावला होता. आता यानंतर सलील कुलकर्णी प्रेक्षकांसाठी काय घेऊन येणार याची उत्सुकता आहेच. पण त्याआधी सलील कुलकर्णी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सेटवर पोहचले आहेत. त्याची सगळीकडे चर्चा होतेय.
प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी हे कायमच विविध गोष्टींवर भाष्य करत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. अनेकदा ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते आयुष्यातील विविध किस्से, आठवणी चाहत्यांना सांगत असतात. आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे त्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.सलील कुलकर्णी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सेटवर पोहचले आहेत.त्यांनी जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्यासोबतच फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा - 'झिम्मा' नंतर हेमंत ढोमेचा 'सनी' ही होणार हाऊसफुल्ल! प्रदर्शनापूर्वीच तोडला 'हा' रेकॉर्ड
सलील कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर तारक मेहता मालिकेतील कलाकारांचे सेटवरचे फोटो शेअर केले आहेत.हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलंय कि, “मुलांच्या लहानपणीचे आणि माझ्या बाबापणाचे अनेक क्षण सुंदर करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. परवा एका शूटिंगसाठी मी आणि शुभंकर गेलो आणि अचानक समोर गोकुळधाम दिसलं, मग मंदार चांदवडकर ने अतिशय प्रेमाने आमची सेटवर जायची सोय केली आणि आपल्या लाडक्या जेठालालची भेट झाली. पुन्हा एकदा मुलं लहान झाली आणि त्या मालिकेने दिलेल्या सुंदर क्षणांचे मी मनापासून आभार मानले.”
सलील कुलकर्णी यांनीशेअर केलेल्या या पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. कुलकर्णी अनेकवर्ष संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. आयुष्यावर बोलू काही हा संगीताचा कार्यक्रम ते करत असतात. संगीतकाराच्या बरोबरीने ते दिग्दर्शनात उतरले आहे. रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाच्या ते भूमिकेत दिसले होते. त्याचबरोबर त्यांच्या फेसबुक पोस्ट देखील लक्षवेधी असतात. आता ते प्रेक्षकांसाठी नवीन काय घेऊन येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
टीव्ही जगतातील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मागील काही दिवसांपासून ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. कारण प्रसिद्ध कलाकार या मालिकेतू एक्झिट घेत आहेत. आधी दयाबेनने मालिका सोडली होती आणि आता तारक मेहता म्हणजेच अभिनेते शैलेश लढा यांनी मालिकेला निरोप दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah