जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अखेर राहुल - दिशाचं झालं शुभमंगल; धुमधडाक्यात पार पडला सोहळा; पाहा Videos

अखेर राहुल - दिशाचं झालं शुभमंगल; धुमधडाक्यात पार पडला सोहळा; पाहा Videos

अखेर राहुल - दिशाचं झालं शुभमंगल; धुमधडाक्यात पार पडला सोहळा; पाहा Videos

राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले लग्नबेडीत. धुमधडाक्यात पार पडला सोहळा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 16 जुलै: बिग बॉस फेम अभिनेता आणि प्रसिद्ध गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांचं लग्नाची गेले काही दिवस चर्चा आहे. तर अखेर आज म्हणजेच 16 जुलै ला त्यांचं लग्न पार पडलं आहे. त्यांच्या लग्नातील सुंदर व्हिडिओज सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. मागील दोन दिवस मेहेंदी (Rahul Vaidya mehendi) आणि हळद (Disha Parmar wedding festivities) असे दोन्ही समारंभ धूमधडाक्यात पार पाडताना दिसले होते. त्यांचे फोटो चांगलेच हीट ठरताना दिसत होते. तर अखेर आता ते विवाह बंधनात अडकले आहेत. (Rahul Vaidya – Disha Parmar wedding)

जाहिरात

बिग बॉसच्या (Big boss 14) घरात राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडिया वर चांगलीच हीट ठरली. दरम्यान 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

आथिया-KL राहुलच्या नात्याला सुनील शेट्टीचा होकार? या वक्तव्यामुळे अभिनेत्रीच्या फॅन्सची वाढली ‘धडकन’

राहुल काही रिॲलिटी शो मध्ये दिसला होता. तर त्यानंतर तो बिग बॉस 14 मध्ये झळकला. तिथे तो दुसऱ्या स्थानावर होता. दिशा ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात

बिग बॉसच्या घरात ती राहुल ला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. तेव्हा राहुलने तिला प्रपोज केलं होतं. या जोडीची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे. अनेकदा ते चर्चेत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात