तर काही वृत्तानुसार के एल राहुलने इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनल साठी जाताना आथिया ला पार्टनर म्हणून लिस्ट मध्ये नाव लिहिलं होतं. मागील महिन्यात ते लंडनला गेले होते.View this post on Instagram
अभिनेते सुनील शेट्टी यांनी नुकतीच बॉम्बे टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत सांगितल आहे की, हो ती लंडन मध्ये आहे. पण तिचा भाऊ अहान सोबत ती तिकडे आहे. ते भाऊ बहीण तिकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले आहेत. शेट्टी म्हणाले.View this post on Instagram
पुढे आथिया आणि राहुल यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, “मला वाटतं तुम्ही हे त्यांच्याशीच बोललात तर बरं होईल. जाहिराती बद्दल बोलायचं झालं तर हा एक इंटरनॅशनल ब्रँड आहे. आणि त्यांनी या दोघांना घेणं पसंत केलं. मला वाटतं ते एकत्र फार चांगले दिसतात. ते एक चांगली जोडी आहेत ना? म्हणजे हे सगळं ब्रँड च्या दृष्टिकोनातून. आणि मला हे म्हणावं लागेल की ते एकत्र सुंदर दिसतात , जाहिरातीमध्ये.”View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kl rahul