मुंबई 15 जून : बॉलिवूडचा दिग्गज दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला (Sushant Singh Rajput) जाऊन नुकतच वर्ष उलटलं आहे. जगभरातील त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) ही सुशांतला गाण्याच्या स्वरुपात श्रद्धांजली वाहिली आहे.
नेहा कक्कर ही सोशल मीडिया नेहमीच तिच्या गाण्यांच्या क्लिप्स शेअर करत असते. आता तिने सुशांतसाठी सुंदर गाण गात व्हिडीओ बनवला आहे. तर सुशांतचे काही फोटो त्या क्लिपमध्ये आहेत. ‘जान निसार’ हे गाण नेहाने गायलं आहे. त्यानंतर सुशांतच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत नेहाचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
नेहाने काही वेळापूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 14 जूनला सुशांतच्या मृत्युला वर्षपुर्ती झाली होती. तेव्हा नेहाने सुशांतच्या आठवणीत हा व्हिडीओ बनवला आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तसेच सुशांतची पूर्व प्रेयसी हिने देखील सुशांतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच तिने सुशांतसाठी घरी एक पूजा देखील ठेवली होती. सुशांतच्या कुटुंबियांनीही सुशांतसाठी शांतीपूजा केली. तसेच सुशांतच्या मृत्युनंतर चौकशीच्या जाळ्यात अडकेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेही (Rhea Chakraborty) सुशांतसाठी एक पोस्ट लिहीली होती.
View this post on Instagram
मागील वर्षी सुशांत मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी आत्महत्या केलेला रुपात आढळला होता. अद्यापही पोलिस त्याच्या मृत्युचा तपास करत आहेत. याशिवाय मृत्युनंतरही सुशांत मोस्ट डिझायरेबल मेन 2020 च्या यादीत सामील झाला आहे. नुकतीच टाइम्सने ही यादी जाहीर केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.