बिझनेस मॅगझिन फोर्ब्ज (Forbes) ने 2020 या वर्षासाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची (Forbes List of Highest Paid Male Actors)यादी जाहीर केली आहे. यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी द रॉक ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson)चे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. टॉप 10 च्या या यादीमध्ये बॉलिवूडचा खिलाडी 'अक्षय कुमार' देखील आहे.
WWE रेसलर आणि हॉलिवूड अभिनेता द रॉक ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson )ने कमाईच्या शर्यतीमध्ये सर्वांना मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. जून 2019 ते जून 2020 या वर्षामध्ये द रॉकची कमाई 87.5 मिलियन डॉलर्स अर्थात जवळपास 6.54 अब्ज रुपये इतकी आहे.