Home /News /entertainment /

'आयुष्य खूप लहान आहे...'; Sidharth Shukla ला आधीच मिळाले होते संकेत?

'आयुष्य खूप लहान आहे...'; Sidharth Shukla ला आधीच मिळाले होते संकेत?

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूनंतर त्याचं एक ट्वीट (Sidharth Shukla tweet) सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

    मुंबई, 02 सप्टेंबर : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याचदरम्यान त्याचं एक ट्वीट (Sidharth Shukla tweet)  सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सिद्धार्थ शुक्लाने आपल्या ट्विटमध्ये आयुष्याबाबत भाष्ट केलं होतं. जीवनाबाबतचं आपलं मत त्याने मांडलं होतं. त्याच्या निधनानंतर हे ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये सिद्धार्थने म्हटलं आहे, 'दुसरं कुणी तुमच्याबाबत काय बोलतं किंवा विचार करतं याची चिंता करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. फक्त आयुष्याचा आनंद घ्या, मजा करा आणि त्यांना काहीतरी बोलायला द्या' सिद्धार्थचं हे ट्वीट 24 फेब्रुवारी, 2021 मधील आहे. पण या ट्विटमधून तो बरंच काही सांगून जातो. हे वाचा - Sidharth Shukla च्या टीमकडून आली पहिली Reaction, 'प्लीज एवढं करा...' कूपर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.  कूपर रुग्णालयात त्याला हृदय विकाराच्या झटक्याने मृत घोषित केलं. मात्र सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काही गोळ्यांच सेवन केलं होतं अशी माहितीही समोर येत आहे.  सिद्धार्थने रात्री सेवन केलेल्या गोळ्यांनंतर सकाळी तो उठूच शकला नाही. तर रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्यामुळे सिद्धार्थने नक्की कोणत्या गोळ्या घेतल्या होत्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हे वाचा - Fake: सिद्धार्थचा शेवटचा VIDEO म्हणून VIRAL होत असलेली क्लिप खोटी! टीव्ही चा प्रसिद्ध शो बिग बॉस 13 चा तो विजेता ठरला होता. त्यानंतर त्याला तुफान लोकप्रियता मिळाली होती. बालिका वधू, बाबुल का अंगण छुटे ना अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तो दिसला. पण बिग बॉस नंतर त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी भर पडली. अभिनेत्री शेहनाझ गील सोबत त्याची केमिस्ट्री सुपरहिट ठरली होती. सिद्धार्थच्या निधनानंतर संपूर्ण सिने सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याच अकाली जाणं अनेकांच्या जिव्हारी लागल आहे. बॉलिवूड ते टीव्ही इंडस्ट्रीकडून आणि त्याच्या लाखो चाहत्यांकडून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Entertainment, Sidharth shukla

    पुढील बातम्या