मुंबई, 12 डिसेंबर - सिद्धार्थ शुक्लची (Sidharth Shukla) आज बर्थ अॅनिवर्सरी (Sidharth Shukla Birth Anniversary) आहे. या निमित्ताने सर्व चाहते त्याला मिस करत आहेत. 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लचे निधन झाले. शहनाज गिलला (Shehnaaz Gill) त्याच्या जाण्याचे सर्वात जास्त दुःख झाले. कारण ती त्याच्यावर प्रेम करत होती. आज 12 डिसेंबर रोजी या अभिनेत्रीने सिद्धार्थचा एक अनोखा पण सुंदर फोटो शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शहनाज सिद्धार्थला करतेय मिस
शहनाजने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं सिद्धार्थला देवदूत म्हणून दाखवले आहे. तिनं फोटोसोबत कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. हा फोटोच तिला काय म्हणायते आहे ते न कळत सांगून जातो. दिवंगत अभिनेता फोटोमध्ये हासताना दिसत आहे. फोटोमध्ये त्याचे पंख देवदूतासारखे दाखवले आहेत.
वाचा : शेहनाजने असं केलं होतं सिद्धार्थाला बर्थडे विश, जुना Video Viral
सिद्धार्थ कुठेही असला तरी तो आनंदी असल्याचे फोटोवरून दिसून येत आहे. शहनाजने 1 तासापूर्वी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता, ज्यावर जवळपास 6 लाख लाईक्स आले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा : विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी ऐकून थक्क व्हाल!
सिद्धार्थला आठवून चाहते भावूक झाले
शहनाज सिद्धार्थला खूप मिस करत असल्याचे तिनं पोस्ट केलेल्या फोटोवरून स्पष्ट होते. अभिनेत्याचा फोटो पाहून त्याचे सर्व चाहते भावूक झाले आहेत. सेलेब्ससोबतच चाहते शहनाजला सपोर्ट करत आहेत. सिद्धार्थने वयाच्या 40 व्या वर्षी हे जग सोडले होते.
सिद्धार्थ आणि शहनाज पहिल्यांदा 'बिग बॉस 13' च्या घरात भेटले, जिथून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थने मृत्यूपूर्वी काही महिने एक गाणे रेकॉर्ड केले होते. शहनाज गिल देखील या गाण्याचा एक भाग आहे. सिद्धार्थलाही रॅपर बनण्याची इच्छा होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.