मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी ऐकून थक्क व्हाल! अनेक कंपन्याच्या CEO पेक्षा अधिक कमाई

विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी ऐकून थक्क व्हाल! अनेक कंपन्याच्या CEO पेक्षा अधिक कमाई

विराट कोहलीसोबत लग्नाच्या आधीपासून सोनू अनुष्काचा बॉडीगार्ड आहे. Zoom.com नुसार, प्रकाश सिंह उर्फ ​​सोनूचा वार्षिक पगार सुमारे 1.2 कोटी रुपये आहे.

विराट कोहलीसोबत लग्नाच्या आधीपासून सोनू अनुष्काचा बॉडीगार्ड आहे. Zoom.com नुसार, प्रकाश सिंह उर्फ ​​सोनूचा वार्षिक पगार सुमारे 1.2 कोटी रुपये आहे.

विराट कोहलीसोबत लग्नाच्या आधीपासून सोनू अनुष्काचा बॉडीगार्ड आहे. Zoom.com नुसार, प्रकाश सिंह उर्फ ​​सोनूचा वार्षिक पगार सुमारे 1.2 कोटी रुपये आहे.

मुंबई, 12 डिसेंबर : बॉलिवूड स्टार्स तसेच इतर सेलिब्रिटी त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे कपडे, गाड्या, घरे इतर गोष्टींबद्दल त्यांच्या चाहत्यांनी नेहमीच उत्सुकता असते. सोबतच बॉलिवूड स्टार्सनाही त्यांच्या आयुष्यात प्रायव्हसी हवी असते. जेव्हा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा ते त्यावर खूप पैसा खर्च करतात. बड्या बॉलीवूड स्टार्सची स्वतःची पर्सनल सिक्युरिटी असते, जेणेकरून ते सार्वजनिक ठिकाणी जातात तेव्हा त्यांना धोक्यापासून संरक्षण मिळू शकते. बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली यांच्याकडेही बॉडीगार्ड आहे. अनुष्काच्या बॉडीगार्डचे नाव सोनू असून तो तिच्यासोबत अनेक वर्षांपासून आहे. अनुष्का शर्मा प्रकाश सिंग उर्फ ​​सोनूला त्याच्या सेवेसाठी भरपूर पगार देते.

पगाराच्याबाबतीत सोनूने अनेक सीईओंना मागे टाकलं

विराट कोहलीसोबत लग्नाच्या आधीपासून सोनू अनुष्काचा बॉडीगार्ड आहे. Zoom.com नुसार, प्रकाश सिंह उर्फ ​​सोनूचा वार्षिक पगार सुमारे 1.2 कोटी रुपये आहे. म्हणजे महिन्याला सोनूचा पगार जवळपास 10 लाखांच्या घरात आहे. सोनूच्या पगाराची तुलना केली तर तो अनेक कंपन्यांच्या सीईओंच्या CTC पेक्षा जास्त आहे.

आधी Topless फोटो तर आता Braless कोटमुळे अभिनेत्री चर्चेत, ईशा गुप्ताचे Latest Photos

विराट-अनुष्कासाठी सोनू कुटुंबाचा भाग

सोनू हा बॉडीगार्ड असला तरी अनुष्का आणि विराटसाठी तो बॉडीगार्डपेक्षा अधिक आहे. कारण स्टार जोडपे सोनूला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात. अनुष्का दरवर्षी सोनूचा वाढदिवस साजरा करते. तुमचा विश्वास बसणार नाही, पण शाहरुख खानसोबत चित्रपटाची शूटिंग करत असताना अनुष्काने 'झिरो' चित्रपटाच्या सेटवर सोनूचा वाढदिवस साजरा केला होता.

IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऋतुराज, अय्यरची जागा निश्चित, 17 शतकं ठोकणारा बाहेर!

सोनू अनुष्काची ढाल

सोनू सार्वजनिक ठिकाणी विराट कोहलीला देखील संरक्षण देतो. विराटची स्वतःची पर्सनल सिक्युरिटी आहे, तरीही सोनू विराटला सुरक्षा पुरवतो, हे येथे लक्षात घ्यायला हवे.

अनुष्का शर्माच्या गरोदरपणात सोनूने तिच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती. जेव्हा अनुष्का गरोदर होती आणि काम करत होती, साथीच्या आजारात तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर जात होती, तेव्हा सोनू तिच्या बाजूला पीपीई किट घातलेला दिसला होता. तो ढालीप्रमाणे अनुष्काचे करत होता.

First published:
top videos

    Tags: Job, Virat anushka, Virat kohali