जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘हा चित्रपट शहिदांना खरी श्रद्धांजली’; ‘Shershaah’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील भावुक

‘हा चित्रपट शहिदांना खरी श्रद्धांजली’; ‘Shershaah’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील भावुक

‘हा चित्रपट शहिदांना खरी श्रद्धांजली’; ‘Shershaah’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील भावुक

हा चित्रपट एका सैनिकाला खरी श्रद्धांजली आहे असं म्हणत त्यांनी ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 26 जुलै**:** बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शेरशाह (Shershaah) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. कारगिल दिवसाचं निमित्त साधून या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. (Shershaah Official Trailer) कारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची (Vikram Batra) शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. हा ट्रेलर पाहून विक्रम बत्रा यांचे आई-वडील भावुक झाले. हा चित्रपट एका सैनिकाला खरी श्रद्धांजली आहे असं म्हणत त्यांनी ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला.

Raj Kundra कसा करायचा आर्थिक व्यवहार? धक्कादायक माहिती आली समोर शेहशाहच्या ट्रेलर लॉन्चिंगसाठी विक्रम यांचे भाऊ आणि कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. आई-वडिलांना प्रकृतीच्या कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. परंतु आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “युद्धावर आधारित ऐतिहासिक चित्रपट पाहून आम्हाला अभिमान वाटतो की, आमच्या मुलाची वास्तविक जीवन कथा यात दाखवली जाणार आहे. खरं तर त्याच्या बालपणापासून सुरू होणारा संघर्ष आयएमए (इंडियन मिलिटरी अकादमी) पर्यंत पोहोचतो आणि शेवटी भारतीय सैन्यात सामील होतो. हा चित्रपट ‘कारगिल’ युद्धातील नायकांना खरी श्रद्धांजली आहे.” ही प्रतिक्रिया देताना ते अत्यंत भावूक झाले होते. टायगर श्रॉफवर कोसळलं होतं आर्थिक संकट; घर विकून झोपत होता जमिनीवर ‘शेरशाह’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णू वर्धन याने केलं आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘शेरशाह’ हा चित्रपट 12 ऑगस्टला Amazon Prime Videoवर रिलीज होणार आहे. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात