जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Raj Kundra कसा करायचा आर्थिक व्यवहार? धक्कादायक माहिती आली समोर

Raj Kundra कसा करायचा आर्थिक व्यवहार? धक्कादायक माहिती आली समोर

Raj Kundra कसा करायचा आर्थिक व्यवहार? धक्कादायक माहिती आली समोर

तो केवळ लंडनमध्येच नव्हे तर आफ्रिका आणि इतर देशांमध्येही पॉर्नोग्राफी संबंधीत आर्थिक व्यवहार करत होता. (Raj Kundra transactions)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 26 जुलै**:** राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. (Raj kundra Pornography Case) सतत राजविरोधात विविध प्रकारचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) सध्या त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहे. यामध्ये काही धक्कादायक माहिती त्यांच्या हाती लागली आहे. तो केवळ लंडनमध्येच नव्हे तर आफ्रिका आणि इतर देशांमध्येही पॉर्नोग्राफी संबंधीत आर्थिक व्यवहार करत होता. (Raj Kundra transactions) ‘शिल्पा शेट्टीला हे धंदे नक्कीच माहित असणार’; शक्तिमानचा Pornography प्रकरणावरून टोला राज कुंद्रा आर्थिक व्यवहार कसा करायचा**?** राज कुंद्रा या पॉर्न चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर थेट पैसे स्विकारत नव्हता. असं केल्यास त्याला मोठ्या प्रमाणावर कर द्यावा लागला असता. यासाठी त्याने एक जॉइंट अकाउंट सुरु केलं होतं. तो आधी पैसे लंडनमधील बँकेत पाठवायचा त्यानंतर ते पैसे इतर देशांमधील अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जायचे. अन् त्या अकाउंटमधून उर्वरीत आर्थिक व्यवहार केले जात होते. राज कुंद्राच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी ही धक्कादायक माहिती क्राईम ब्रांचच्या हाती लागली. एका फोटोमुळे संपलं माहिकाचं करिअर; Pornstar म्हणून झाली होती ट्रोल राज कुंद्राच्या संकटात वाढ**;** पोलिसांच्या हाती लागली गुप्त तिजोरी क्राईम ब्रांचने दोन दिवसांपूर्वी राजच्या अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीज या कंपनीच्या ऑफिसवर छापा मारला होता. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती एक गुप्त तिजोरी लागली. या तिजोरीमध्ये अनेक महत्वाच्या फाईल ठेवल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फाईलमध्ये राजने ब्रिटीश कंपनीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे. सध्या या प्रकरणात ED ने देखील उडी घेतली आहे. त्यामुळे आता राज कुंद्रा विरोधात पोलिसांच्या हाती अनेक सबळ पुरावे लागले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात