मुंबई, 13 एप्रिल : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे आजकाल सोशल मीडिया सेन्सेशन बनले आहेत. दोघांच्या लग्नापासून ते चांगलेच चर्चेत आले आहेत. या दोघांचं प्रेम ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फुललं होतं. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. दोघांची लव्हस्टोरी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता लग्नानंतर या दोघांना पुन्हा स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आता दोघे लवकरच एका सिनेमात एकत्र झळकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणता आहे हा सिनेमा जाणून घ्या डिटेल्स…
बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्या सीक्वलची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. यापैकी एक चित्रपट म्हणजे अक्षय कुमारचा ‘राउडी राठौड’. आतापर्यंत अक्षय कुमारच्या या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स समोर आले आहेत. नुकतीच बातमी आली होती की या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच ‘राउडी राठौर 2’ मध्ये अक्षय कुमारच्या जागी सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. आता याबाबत पुष्टीही करण्यात आली आहे. यानंतर या चित्रपटाशी संबंधित आणखी बातम्या समोर आल्या आहेत. या अभिनेत्री आणि दिग्दर्शकाचे नावही चित्रपटाशी जोडले जात आहे. यासंबंधीचे वृत्त ‘बॉलिवूड लाईफ’ने दिले आहे. सतीश कौशिक यांच्या वाढदिवशी वाईट झालीये लेकीची अवस्था; पुतण्या म्हणाला ‘ती पुन्हा पुन्हा रडतेय…’ नुकतीच ‘राउडी राठौर 2’ या चित्रपटाविषयी एक बातमी समोर आली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की या चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. आता या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार, आता या चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार हे निश्चित झाले आहे. याशिवाय ‘राउडी राठौर 2’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत त्याची पत्नी कियारा अडवाणीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यासोबतच अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रभू देवाने दिग्दर्शित केला होता. वृत्तानुसार, निर्मात्यांच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे त्याने चित्रपट सोडला. ‘राउडी राठौर 2’ बद्दलच्या या बातमीने अक्षय कुमारच्या चाहत्यांना दु:ख झाले आहे मात्र सिद्धार्थ कियाराचे फॅन्स चांगलेच आनंदित आहेत. ‘राउडी राठौर’ च्या पहिल्या भागात अक्षय कुमारसोबत सोनाक्षी सिन्हाही दिसली होती. पण कियाराच्या एन्ट्रीनंतर सोनाक्षी सिन्हा दिसणार नाही असं समजत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता खरंच हा सिनेमा अस्तित्वात येऊन प्रेक्षकांना सिद्धार्थ कियाराला एकत्र पाहता येणार का हे येणाऱ्या काळातच समजेल.