मुंबई 12 ऑगस्ट: शेरशाह सिनेमात झळकलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवानी हे आघाडीचे कलाकार एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे आहे. या दोघांना नेहमीच एकत्र पाहिलं जात आणि अनेकदा ते एकत्र व्हेकेशनचा आनंद घेताना सुद्धा दिसून आलं आहेत. सध्या सोशल मीडियावर घोषणा करत या दोघांनी एका डेटचा बेत आखला असून त्याचीच चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. किआरा आणि सिद्धार्थ यांच्या जोडीला शेरशाह सिनेमामुळे ओळखलं जातं. कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांची प्रेयसी अशा या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. या सिनेमाला आज एक वर्ष पूर्ण झालं असून त्यानिमित्ताने सिनेमाची पुन्हा एकदा आठवण काढली जाताही. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्यासह सिनेमातील सीड आणि किआराच्या केमिस्ट्रीबद्दल सुद्धा बोललं जात आहे. अशातच सिनेमाची स्टाईल कायम ठेवत किआरा आणि सिद्धार्थ यांचा खास इन्स्टाग्राम स्टोरीमधून चालणारा संवाद खूप viral होताना दिसत आहे. हे ही वाचा- Urvashi Rautela: उर्वशी रौतेलानं ऋषभ पंतला म्हटलं ‘छोटू भैय्या’; क्रिकेटरच्या पोस्टनंतर अभिनेत्रीने पुन्हा घेतली फिरकी यामध्ये किआराने सिद्धार्थला टॅग करत,”तू बाते तो बडी बडी करता था पर तू भी ना ‘out of sight out of mind’वाला बंदा निकला” असं लिहिलं आहे. त्यावर सिद्धार्थने उत्तर देत, “ओय सरदारनी मुझे ना सब याद है भूल ही नही सकता. आज छह बीजे मिल्ने आ जाउंगा” असं लिहिलं आहे. “ओके देन इट इज ए डेट.” असं उत्तर देत किआराने सुद्धा नवी स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामुळे आज शेरशाह सिनेमाला एक वर्ष झाल्याच्या आनंदात ही जोडी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येणार असल्याचं समोर आलं आहे. दोघांचा हा अवखळ संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
किआरा आणि सिद्धार्थ या दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे याबद्दल दोघांपैकी कोणीच खुलासा केलेला नाही. पण सिद्धार्थ आणि किआरा नुकतेच एका हॉलिडे एकत्र जाऊन आले. अगदी डिनर पासून ते सेटवर एकमेकांना भेट देण्यापर्यंत अनेकदा हे दोघे एकत्र दिसत असतात. त्यांच्या डेटिंग रुमरला अनेक चॅट शोमधून सुद्धा पुष्टी देण्यात आल्याच दिसून आलं आहे. पण दोघांनी एकमेकांशी असलेलं नातं अजून ऑफिशियल केलेलं नाही.