मुंबई, 11 ऑक्टोबर : अक्षय कुमार बॉलिवूडचा दमदार अभिनेता आहे. पण काही दिवसांपासून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटत आहेत. अक्षयचे लागोपाठ चित्रपट फ्लॉप झाले. त्याचा ‘सम्राट अशोक’ सारखा बिग बजेट सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. पण आता तो पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर टीझरपेक्षा चांगला आणि थरारक आहे. हा चित्रपट रामसेतूच्या रहस्यावरून पडदा उठणार आहे. ‘राम सेतू’ची कथा नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञ आर्यन कुलश्रेष्ठ म्हणजेच अक्षय कुमार याच्याभोवती फिरते. पौराणिक राम सेतूचे खरे अस्तित्व सिद्ध करण्याचे काम आर्यनला मिळते. यानंतर, आर्यन ‘राम सेतू’ च्या पौराणिक कथा आणि विज्ञानाच्या तंत्राने त्याचे सत्य शोधणे सुरू होते. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत. हेही वाचा - Video: विद्या बालनला पडली मराठीची भुरळ; व्हिडीओ शेअर करत सांगितलं खोकल्यावर रामबाण औषध आर्य सत्य आणि राम सेतूच्या अस्तित्वाविषयी शोध घेताना दिसतो. त्या दरम्यान, त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तो विज्ञानाच्या मदतीने पौराणिक संबंध शोधण्याचा प्रयत्न करतो. ट्रेलरमध्ये राम सेतूशी संबंधित अनेक अॅक्शन सीन्स आणि रहस्ये पाहायला मिळतात. आर्यन 7 हजार जुना इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि राम सेतूजवळ पोहोचतो. यात त्याच्यासोबत जॅकलीनसुद्धा त्याची मदत करताना दिसणार आहे.
‘रामसेतू’ च्या ट्रेलरमध्ये बरीच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. समुद्रातील दृश्ये आणि हेलिकॉप्टरचे स्टंट थक्क करणारे आहेत. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले, “राम सेतूची पहिली झलक आवडली. त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. ट्रेलर तुम्हाला आणखी आवडेल अशी आशा आहे. आणि या दिवाळीत आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासह राम सेतूच्या जगाचा एक भाग होऊ या.’’
अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, हा चित्रपट 25 ऑक्टोबरलाच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘थँक गॉड’ देखील रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपट देवाशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.