मुंबई, 4 फेब्रुवारी- बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा आहे. जरी, या जोडप्याने अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, त्यांनी या गोष्टींना नकारही दिलेला नाहीय. काल प्रसिद्ध सेलिब्रेटी मेहंदी डिझायनर वीणा नागदा राजस्थानसाठी रवाना झाल्या होत्या. त्यांनी स्वतः इन्स्टाग्राम अकाउंटवर एयरपोर्टवरील फोटो शेअर केला होता. दरम्यान आता नवरी कियारा अडवाणी आपल्या कुटुंबासोबत राजस्थानला रवाना झाली आहे. अभिनेत्रीचा एयरपोर्टवरील व्हिडीओ समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा-सिड राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न करणार आहेत. या दोघांनी आपल्या लग्नासाठी जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेस बुक करण्यात आला आहे. लग्नाआधीचे सर्व विधीही येथे पार पडणार आहेत. सुमारे 150 व्हीव्हीआयपी पाहुणे या हायप्रोफाइल लग्नाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नववधू कियारा तिच्या हाताला मेंदी लावतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीसोबत सेलिब्रिटी मेहंदी कलाकार वीणा नागदा देखील दिसत आहे. (हे वाचा: Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराची रॉयल वेडिंग;एका खोलीचं भाडं दीड लाख, बुक केले 84 रुम;आतून असा दिसतो शाही महाल ) हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, कियाराच्या हातावर मेहंदी लावण्यात आल्याचं अनेकांना वाटत आहे. मात्र असं नाहीय. कियाराचा हा व्हायरल झालेला फोटो तिच्या एका जाहिरातीदरम्यानचा आहे. खरं सांगायचं तर, कियारा आता राजस्थानसाठी रवाना झाली आहे. नुकतंच कियारा प्रायव्हेट एयरपोर्टवर दिसून आली.
प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कियारा पांढऱ्या रंगाच्या कॅज्युअल पॅंट टी शर्टमध्ये आहे. अभिनेत्रीने गुलाबी रंगाची शॉलसुद्धा ओढली आहे. कियारा एयरपोर्टमध्ये आत जाताना पापाराझींकडे पाहून हात उंचावत प्रतिसाद देत आहे. विशेष म्हणजे कियाराचे कुटुंबीयसुद्धा तिच्यासोबत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब होत आहे.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशलनेसुद्धा असच केलं होतं. कतरिना कैफसुद्धा आपल्या लग्नाआधी याच एयरपोर्टवर कुटुंबासोबत दिसली होती. ती इथून राजस्थानला रवाना झाली होती. या दोघांनीसुद्धा राजस्थान मध्येच खाजगी विवाह होता.