बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीला ओळखलं जातं. गेल्या अनेक दिवसापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
हे सेलिब्रेटी कपल कधी लग्न करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. दरम्यान आता अथिया शेट्टी आणि केएल राहुलनंतर हे दोघेही लग्न बंधनात अडकण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे.
आज तकच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा राजस्थान, जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाह करणार आहेत.
या दोघांच्या गेस्ट लिस्टमध्ये शाहरुख खान, वरुण धवन आणि करण जोहरसारखे पाहुणे कलाकार उपस्थित राहणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराने आपल्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग केलं आहे.