बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपं राजस्थान, जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही थाटात लग्न करणार आहेत. या शाही महालाचे इन्साईड फोटो आता समोर आले आहेत. या महालचा थाट पाहून सर्वच थक्क होत आहेत.(फोटो: सूर्यगढ पॅलेस अधिकृत इन्स्टाग्रामवरून) असं म्हटलं जात आहे की, सिद्धार्थ-कियाराने आपल्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी या रॉयल पॅलेसमध्ये ८४ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पॅलेसमधील एका रात्रीचं खोलीचं भाडं तब्बल १ लाख ३० हजार इतकं आहे. या पॅलेसच्या अधिकृत वेबसाईटच्या रिपोर्ट्सनुसार, व्हेलेंटाई महिना अर्थातच फेब्रुवारीमधील दर एका दिवसासाठी २४ हजार ते ७६ हजार रुपये इतके आहेत. या रॉयल पॅलेसमधील रात्रीचा नजारा फारच सुंदर असतो. याठिकाणी लोकगीत, लोकनृत्य असे विविध कार्यक्रम होत असतात. सिद्धार्थ आणि कियारा कुटुंबीय आणि काही खास सेलिब्रेटी, फ्रेंड्सच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत.