मुंबई, 09 एप्रिल : अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) आपल्या अभिनयासह फिटनेसमुळे कायम चर्चेत असतो. विद्युत सोशल मीडियावरही (Social Media) अॅक्टिव्ह आहे. नुकतंच त्याने त्याच्या एका पोस्टमध्ये मार्शल आर्ट कलारीपयट्टुमधील (Kalaripayattu) त्याचं कौशल्य दाखवलं. विद्युतने त्याची ही कला सादर करतानाचा फोटो टाकून एक ट्विट केलं आहे. या ट्विटचं सर्वांनी कौतुक केलं असताना, बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) मात्र त्यात एक चूक काढली आहे. विद्युत जामवालने (Vidyut Jamwal) शेअर केलेल्या या फोटोत या फोटोत विद्युत एका पायावर उभा असलेला दिसत आहे. आणि दोन्ही हात सरळ हवेत दिसताहेत. या फोटोत त्याची फीट बॉडी दिसते. या फोटोसह विद्युत म्हणाला, ‘कलारीपयट्टू म्हणतं की जेव्हा तुम्हाला न थांबता पुढे जायचं तेव्हा तुम्ही थांबू नकाच. अगदी तुमचं मन सांगत असेल तरीही थांबू नका.’
विद्युतच्या या फोटोचे हृतिक रोशन आणि नेहा धुपियाने कौतुक केलं. तर, सिद्धार्थ शुक्लानं (Sidharth Shukla) विद्युतच्या कॅप्शनमधील चूक पकडली.
सिद्धार्थ शुक्लानं विद्युतच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिलं की, भाई, ‘#Kalaripayattu चा मी सन्मान करतो. मात्र अनस्टॉपेबल (Unstoppable) शब्दाचा अर्थ आहे, की तुम्ही थांबू नये. मग तुमचं मन म्हणू देत अथवा दुसरं कोणी’
Shukla ji aao ho bolo woh sahi..
— Vidyut Jammwal (@VidyutJammwal) April 8, 2021
Because I love you..
To be the man you gotta beat the man!! https://t.co/oMG3JRV3wS
सिद्धार्थच्या या कमेंटला विद्युतनंही उत्तर दिलं. विद्युत म्हणाला की, ‘शुक्लाजी, तुम्ही म्हणाल तेच खरं, कारण मी तुमच्यावर प्रेम करतो.’ हे वाचा - ‘मास्क वापरण्यातच खरी हिरोपंती’; कोरोनाकडं दुर्लक्ष करणारा टायगर होतोय ट्रोल विद्युत जामवाल त्याच्या अॅक्टिंगपेक्षा अॅक्शनसाठी अधिक प्रसिद्ध आहे. विद्युतची अॅक्शन बघून लोक चकित होतात. कितीही कठीण स्टंट असला तरी विद्युत अगदी सहजपणे करून घेतो. विद्युत अनेक प्रकारच्या मार्शल आर्ट फॉर्ममध्ये पारंगत आहे. विद्युतच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘कमांडो’ चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर त्याचा ‘खुदा हाफिज’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हे वाचा - शरद केळकरला झाला Deja vu; हा व्हिडीओ पाहून तुम्हीही जाल चक्रावून तर, दुसरीकडे सिद्धार्थही सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असतो. सिद्धार्थ लवकरच अल्ट बालाजीच्या ‘ब्रोकन बट ब्युटीफूल’ वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत या वेब सीरिजमध्ये सोनिया राठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.