जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / शरद केळकरला झाला Deja vu; हा व्हिडीओ पाहून तुम्हीही जाल चक्रावून

शरद केळकरला झाला Deja vu; हा व्हिडीओ पाहून तुम्हीही जाल चक्रावून

शरद केळकरला झाला Deja vu; हा व्हिडीओ पाहून तुम्हीही जाल चक्रावून

अभिनेता शरद केळकर त्याच्या सोलो लिड भूमिकेतील चित्रपटासाटी सज्ज झाला आहे. लवकच हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला योणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 9 एप्रिल : फायनेस्ट अभिनेता (finest actor) अशी ओळख निर्माण केलेला अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) आता नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ (Tanhaji- The unsung worrior) , ‘लक्ष्मी’ (Lakshmi) या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली आहे. या चित्रपटानंतर त्याच्या अभिनयाचं चांगलच कौतुक झालं होतं. पण या दोनही चित्रपटांत तो सहाय्यक अभिनेत्याची भूमिका बजावत होता. तर आता तो सोलो लिड भूमिकेतून नव्या चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक अभिजीत वारंग यांच्या नव्या चित्रपटात तो दिसणार आहे. ‘देजा वू’ (Deja vu) असं या चित्रपटाचं नाव आहे. यात शरद केळकर मुख्य भूमिका साकारणार आहे. शरद ने स्वताच चित्रपटाविषयी सांगितलं आहे. तर हा चित्रपट आपल्यासाठी विशेष असल्याचही त्याने म्हटलं आहे. हा पहिलाच असा चित्रपट असणार आहे ज्यात एक पात्र एकाच ठिकाणी असणार आहे तर बाकी सगळी पात्र ही वॉइस ओव्हर करणार आहेत. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अभिजीत वारंग याच्या चित्रपटात आपण काम करणार असल्याचंही त्याने म्हटलं. त्यामुळे हा अतिशय वेगळ्या थाटनीचा चित्रपट असल्याचं समजतं आहे.

जाहिरात

अभिजीत वारंग (Abhijit warang) राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक असून ‘पिकासो’ (Piccaso) या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला होता. चित्रपटात शरद ची मुख्य भूमिका असून अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), अक्षय वाघमारे, किशोरी शहाने (Kishori shahane), संजय मोने आदी कलाकार देखिल दिसणार आहेत.

इरफानच्या आठवणीनं बॉलिवूड झालं भावुक; ती फिल्म पाहून कलाकारांना कोसळलं रडू

शरदने तान्हाजी- द अनसंग वॉरियर चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर शरद च्या अभिनयाच फारच कौतूक झालं होतं. तर त्यानंतर लक्ष्मी या चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका त्याने केली होती. शरद च्या त्या भूमिकेलाही भरभरून प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय त्याने लय भारी, हाऊसफूल ४, या चित्रपटांत त्याने काम केलं आहे. तर पावनखिंड , भूज, जर्सी, आयलन, देजा वू या आगामी चित्रपटांत तो झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात