मुंबई, 9 एप्रिल : मुंबईत (Mumbai corona patients) तसेच देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेन् दिवस वाढत आहे. तर मास्क घालण्यावर कडक निर्बंध देखिल आणले आहेत. पण अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा विना मास्क फिरत असल्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगलच ट्रोल केलं आहे. तर याआधी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिला देखिल विना मास्क फिरल्याने युझर्सनी धारेवर धरलं होत.
अभिनेता टायगर श्रॉफ ने नुकतेच काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. पण यात तो विना मास्क आहे. तर आजूबाजूच्या सर्व लोकांनी मास्क घातला आहे. आणि त्यामुळे नेटकऱ्यांनी टायगरला चांगलच ट्रोल केलं आहे. हिरोपंती 2 (Hiropanti 2) या त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेट वरचा हा फोटो आहे. साजीद नादियावाला (Sajid nadiawala) प्रोडक्शनचा हा चित्रपट असून नुकतंच चित्रपटाचं चित्रिकरण संपलं आहे. आणि त्यानंतर टायगरने हा फोटो पोस्ट केला होता.
टायगरच्या या पोस्ट वर अनेक मीम्स व्हायरल झाले. टायगरने फोटो पोस्ट करताना हिरोपंती 2 चं कॅप्शन दिलं होत. तेव्हा नेटकऱ्यांनी टायगर ला खरी हिरोपंती काय असते ते समजावलं आहे. मास्क घालण्यातच खरी हिरोपंती असल्याचं काहींनी म्हटलं तर ज्यांनी मास्क घातले आहेत ते खरे हिरो आहेत असं काहीजण म्हटले.
मुंबईत सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून काही प्रमाणात लॉकडाउन आणि निर्बंध लावण्यात आले आहेत. मास्क परिधान करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे. तर मास्क न घालणाऱ्यांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. पण अशातच सेलिब्रिटी विना मास्क फिरल्याने नेटकरी संतप्त झाले.
अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागन झाली आहे. अक्षय कुमार , आलिया भट्ट, कॅटरीना कैफ, विकी कौशल, भूमी पेडणेकर यांना कोरोनाची लागन झाली होती.
Published by:News Digital
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.