• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'तूच मारलं मला' सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटवर लावला गंभीर आरोप

'तूच मारलं मला' सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटवर लावला गंभीर आरोप

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटवर केलेल्या कमेंटने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 • Share this:
  मुंबई २४ जुलै : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि प्रिया बापट (Priya Bapat) स्टारर ‘सीटी ऑफ ड्रिम्स’ (City Of Dreams) ही सीरिज विशेष लोकप्रिय ठरली होती. तर त्याच्याच आता दुसरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातीलच एक सीन सोशल मीडियावर अभिनेता सिद्धार्थने पोस्ट केला आहे. पण सिद्धार्थने यावेळी अभिनेत्री प्रिया बापटवर एक गंभीर आरोप लावला आहे. सस्पेन्स क्राइम थ्रीलर असणारी ही सीरिज विशेष लोकप्रिय ठरली होती. मुंबईतील एका नामांकीत नेत्याभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना आवडली होती. तर सिद्धार्थ आणि प्रिया बापट यांचं कामही आवडलं होतं. पण दुसऱ्या पर्वातील एक फोटो सिद्धार्थने शेअर केला आहे ज्यात तो मृत दाखवला आहे. व त्याचा फोटो भिंतीवर लावला आहे.

  HBD: विदेशी असूनही Bold Look नापसंत; सलमानची कथित गर्लफ्रेंड म्हणूनही चर्चेत आहे Lulia Vantur

  सिद्धार्थच्या या पोस्टवर प्रिया बापटने ‘सिद्द्या’ अशी कमेंट केली आहे. पण सिद्धार्थने, 'गप, तूच मारलं मला' असा रिप्लाय दिला आहे. यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी यावर रिप्लायही दिले आहेत.
  येत्या 30 जुलै पासून ‘सीटी ऑफ ड्रिम्स’ (City of dreams season 2) सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांचीही उत्कंठा वाढली आहे. नवा सीझन आणखी नवं काय घेऊन येणार याकडे प्रेक्षकाचं लक्ष लागलं आहे. प्रिया आणि सिद्धार्थ शिवाय या वेब मालिकेत अभिनेते सचिन पिळगांवर, अतुल कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, अजाज खान अशी स्टारकास्ट आहे. नागेश कुकूनूर यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सिद्धार्थ सध्या ‘सांग तू आहेस का’ स्टार प्रवाह वरील मालिकेतही काम करत आहे. त्यातील त्याची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरत आहे. तर प्रिया बापट मागील वर्षी ‘आणि काय हव सीझन २’ मध्ये दिसली होती.
  Published by:News Digital
  First published: