रोमन मॉडेल , अभिनेत्री आणि गायक युलिया व्हेंतूर भारतातही प्रसिद्ध आहे. 24 जुलै 1980 ला तिचा जन्म झाला होता. जाणून घ्या युलियाविषयी खास गोष्टी.
युलियाने काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला राधे या चित्रपटासाठी तिने सीटीमार हे गाणं गायलं होतं. हे गाणं सुपरहीट ठरलं होतं.
युलियाला सलमान खानमुळे अधिक ओळखलं जातं. काही वृत्तानंसार 2010 मध्ये सलमान डबलिनमध्ये त्याचा चित्रपट ‘बॉडीगार्ड’चं शुटींग करत होता, तेव्हा युलिया त्याला भेटायला चित्रपटाच्या सेटवर आली होती. तेव्हाच दोघांची पहिली भेट झाली होती.
पण जेव्हा लुलियाला काम मिळत नव्हतं तेव्हा सलमान खानची बहीण अलविरा खान आणि तिच्या पतीच्या ओ तेरी चित्रपटात तिला आयटम साँग करण्याची संधी मिळाली.
अनेकदा लुलिया सलमान खन आणि कुटुंबियांसोबतही काही ठिकाणी दिसली आहे. विदेशी असूनही भारतीय संस्कृतीची तिला भूरळ पडली आहे. अनेकदा ती भारतीय कपड्यांत दिसून येते.
मागील लॉकडाउनमध्ये ती सलमान खानसोबत त्याच्या फार्महाऊसवर भारतातच वेळ घालवत होती. यावेळी ती तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.