अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालिकाविश्वातील गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बिग बॉस मराठी' मध्ये सहभागी झाल्यापासून ती कायमच चर्चेत राहिली. त्यानंतर तिने विविध मालिकांमधून भूमिका साकारल्या.
काही दिवसांपूर्वी शर्मिष्ठाने तेजस देसाई याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. ती तिच्या संसारात खूपच खुश आहे असं दिसून येतं .
शर्मिष्ठा सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती तिच्या फोटोंसोबतच आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीची माहिती चाहत्यांना देत असते.
शर्मिष्ठाच्या पती तेजसचा आज २९ जुलै रोजी वाढदिवस आहे. तिने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत चाहत्यांना हि माहिती दिली आहे.
तिने या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'जगातल्या सगळ्यात भारी नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखा खरं प्रेम करणारा नवरा मिळाला. तूला जे हवय ते सगळं मिळो.'
तिने नवऱ्याचं कौतुक करत म्हटलं आहे कि, 'मी स्वतःची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत करणाऱ्या मुलासोबत लग्न केलंय आणि त्याचा मला अभिमान वाटतो.' अशा शब्दात भावना व्यक्त करत शर्मिष्ठाने नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ती सध्या गोव्यामध्ये मित्र मैत्रिणीसोबत धुमधडाक्यात नवऱ्याचा वाढदिवस साजरा करत आहे. 'आणि २९ जुलै तेजसच्या बर्थडे साठी आम्ही निघालो...' असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.
शर्मिष्ठाने नवऱ्याला काही दिवसापूर्वीच वाढदिवसाचं गिफ्ट दिलं होतं . तिने नवऱ्याला गिफ्ट म्हणून चक्क नवी गाडी दिली होती.
तिने '२९ जुलै ला तेजस चा वाढदिवस असतो तर त्या निमित्ताने गाडी तेजस ला gift केली.. ' म्हणत चाहत्यांसोबत हि गुड न्यूज शेअर केली होती.