मुंबई, 05 ऑगस्ट: मराठी सिनेसृष्टीत चॉकलेट बॉय हँडसम हंक म्हणून चर्चेत असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थनं त्याच्या अभिनयानं सर्वांची मन जिंकलीच आहेत. मात्र त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील तो चर्चेत असते. सिद्धार्थ नुकताच नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनला गेला होता. लोकेश गुप्ते दिग्दर्शिक congratulations या सिनेमाचं शुटींग उरकून सिद्धार्थ नुकताच मुंबईला परतला आहे. लंडनसारख्या प्रगत आणि आलिशान देशात अनेक दिवस राहून आल्यानंतर सिद्धार्थला एका मोठ्या गोष्टीची जाणीव झाली आहे मुंबईमध्ये परत येताच सिद्धार्थ एक व्हिडीओ शेअर केलाय. जो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्यात. सिद्धार्थ लंडनमध्ये अभिनेता लोकेश गुप्ते, अलका कुबल, पूजा सावंत सारख्या कलाकारांबरोबर शुटींग करत होता. कलाकारांनी लंडनमध्ये शुटींग करता करता चांगलीच धम्माल केली. कलाकारांसाठी सगळ्या सुख सोयी उपलब्ध होत्या. खाण पिणं कशाचीच कमी नव्हती. पण असं म्हणतात सगळ्याच गोष्टी एकत्र कधीच मिळत नाही. असचं काहीसं लंडनमध्ये सिद्धार्थच्या बाबतीत झाली. एक गोष्ट सिद्धार्थनं लंडनमध्ये प्रचंड मिस केली. हेही वाचा - Gauri Nalawade: ‘विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही म्हणालास…’; अभिनेत्री गौरी नलावडेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन
सिद्धार्थनं मुंबईत येताच त्या गोष्टीची त्याच्या आयुष्यात किती किंमत आहे हे सांगत काहीसा भावूक होत व्हिडीओ शेअर केलाय, ज्यात तो म्हणतोय, ‘यार लंडनमध्ये तुझी खूप आठवण आली. सगळं होतं तिथे पण तु नाही. किती प्रगत देश आहे तो किती काय काय आहे तिथे. पण तुला जे जमतंना ते कोणालाच जमू शकत नाही. काय मिस केलं यार मी तुला, काय मिस केलं. तुझ्यासारखं कोणीही नाहीये या जगात कोणीही नाही. आय लव्ह यू’. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ असं म्हणतो आणि शेवटी बाथरुममध्ये असलेल्या स्प्रेकडे कॅमेरा फिरवतो. लंडनमध्ये सिद्धार्थ मिस करत असलेली गोष्ट दुसरी तिसरी कोणतीही नसून बाथरुममधला स्प्रे आहे. हे व्हिडीओच्या शेवटी कळत आहे. व्हिडीओचा शेवट पाहून सगळ्यांना हसू आवरलेलं नाही. अनेक कलाकारांनी सिद्धार्थच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्यात. अभिनेत्री स्पृहा जोशीनं सिद्धार्थला ‘घानेरडा’ म्हटलंय, तर पुजा सावंत, सई ताम्हणकर, रेशम टिपणीस यांनी ‘हो हे खरंय’ असं म्हटलंय. तर अभिनेता अभिजीत खांडकेकरनं ‘सत्यवचन’ अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केलाय.