मुंबई, 04 ऑगस्ट: स्टार प्रवाहवरील 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे. स्वप्नांच्या पलिकडे मालिकेतील वैदेही आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. फार कमी वेळात तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर गौरी अनेक मालिका आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. गौरीच्या या प्रवासात तिचे आई वडील तर तिच्या पाठीशी होतेच मात्र आणखी एक व्यक्ती तिच्याबरोबर कायम असायची ती म्हणजे तिचे छोटू दादा. छोटी दादा अनेक वर्ष गौरीबरोबर असायचे मात्र त्याच छोटी दादांचं अचानक निधन झालं आहे. त्याच्या जाण्याचं कारण गौरीनं सांगितलेलं नाही पण गौरी आणि छोटू दादांचं फार जवळचं नात होतं. गौरीनं सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
गौरी आजवर शुटींगसाठी कोणत्याही ठिकाणी जात होती तिथे छोटू दादा तिच्याबरोबर असायचे. तिच्या कुटुंबातील ते एक सदस्य झाले होते. छोटू दादाच्या अचानक जाण्यानं गौरीला मोठा धक्का बसला आहे. छोटू दादा केवळ गौरीचे दादा नव्हते तर मराठी सिनेसृष्टीतील अनेकांचे लाडके दादा होते. छोटूच्या निधनाची माहिती देत गौरी भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गौरीनं भावूक होत म्हटलंय, 'मॅम मी विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही म्हणालास.... जिथे असशील तिथे छान राहा छोटू. आई बाबा, निकिताची काळजी करु नकोस आम्ही सगळे आहोत. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे'.
हेही वाचा -
Sharad Ponkshe: शरद पोंक्षे दिसतायत १० वर्ष तरुण; त्यांचा नवीन लूक पाहिलात का?
गौरीच्या भावूक पोस्टवरुन छोटू दादा तिच्यासाठी किती महत्त्वाचे आणि जवळचे होते ते दिसत आहे. छोटू दादाचं जाणं हा गौरीसाठी मोठा लॉस असल्याचं तिनं म्हटलं आहे. छोटू दादांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीतील अनेक जणांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेता सुयश टिळक, हृता दुर्गुळे, इशा केसकर, शर्वरी जोग सारख्या अनेक कलाकारांनी या बातमीनं धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेते समीर चौघुलेनं म्हटलंय, 'खूपच शॉकिंग आहे हे...२ फिल्म साठी इव्हेंट साठी माझ्या साथीला ही होता हा..अत्यंत गोड स्वभावाचा होता हा'. मध्यंतरी अभिनेता संतोष जुवेकरला एका मुलाखतीत त्याला 'गौरी नलावडेकडून तुला काय चोरावंस वाटेल?', असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देत संतोषनं 'मी गौरीचा छोटू चोरेन', असं म्हटलं होतं. छोटू म्हणजेच गौरीचा छोटू दादा. सिनेसृष्टीतील सगळ्याचं कलाकारांना छोटू दादा माहिती होते. त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.