मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tiny Panda च्या नात्याची 5 वर्षं! मराठीतल्या या crazy couple ची भन्नाट स्टोरी, कुठे भेटले माहीत आहे का?

Tiny Panda च्या नात्याची 5 वर्षं! मराठीतल्या या crazy couple ची भन्नाट स्टोरी, कुठे भेटले माहीत आहे का?

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर (Siddharth Chandekar and Mitali mayekar)या crazy couple ने सगळ्यांना वेड लावलं आहे. त्यांच्या आयुष्यातल्या खऱ्या घटनांवर आधारित रिल्स बघताना खूप मजा येते. पण या कपलची खऱ्या आयुष्यातली लव्हस्टोरी माहित आहे का?

पुढे वाचा ...
  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 1 जून: अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) या अफलातून कपलबद्दल सगळीकडे कायमच चर्चा होत असते. इन्स्टाग्रामवर ऍक्टिव्ह असलेलं हे कपल त्यांच्या खट्याळ आणि गोड अंदाजामुळे सगळ्यांना आवडतात. त्यांच्या डेटींग लाईफबद्दल सुद्धा बरेच पारदर्शक राहून अनेक अपडेट्स ते त्यांच्या चाहत्यांना अगदी सुरवातीपासून देत आले आहेत. त्यांच्या नात्याला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत.

याबद्दल एक खास पोस्ट मितालीने शेअर केली आहे. यात ती लिहिते, "5 years of knowing this goofball.🌍🌸

Life been a bit better and crazier since then.♥️"

2021 मध्ये विवाहबंधांत अडकलेल्या या जोडीची खरी लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का? ही खूपच इंटरेस्टिंग लव्हस्टोरी आहे. सिद्धार्थने राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या लव्हस्टोरीबद्दल खुलून सांगितलं होतं.

सिद्धार्थ आणि मिताली एका वाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त एकमेकांना भेटले होते आणि तेव्हा त्यांची फारच मोजकी ओळख झाली होती. फक्त hello-hi च्या भेटीनंतर बराच काळ ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. तेव्हा ते दोघेही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत रिलेशनमध्ये होते.

" isDesktop="true" id="711149" >

एकमेकांशी इंस्टाग्रामवर गप्पा मारता मारता एक दिवस त्यांनी भेटण्याचा प्लॅन केला. तेव्हा ते दोघेही सिंगल होते. आणि हळूहळू भेटीगाठी वाढत गेल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचं पहिलं बोलणं इन्स्टाग्रामवर झालं म्हणून त्यांनी इन्स्टाग्रामचा लोगो टॅटू म्हणूनसुद्धा काढून घेतला.

सिद्धार्थ आणि मिताली 2 वर्ष लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होते. तोवर त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवसाला तिला प्रपोज करून रिंग दिली आणि त्या घटनेनंतर त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसवर अधिकृत शिक्का बसला.

सिद्धार्थ मितालीने 24 जानेवारी 2021 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. त्यांच्या क्रेझी आणि मजेदार नात्याबद्दल त्यांचे फॅन्स कायमच सपोर्टिव्ह राहिले आहेत.

हे ही वाचा-  Neha Kakkar: एअरपोर्टवर घडलं असं काही की नेहा कक्कर धावली मदतीला! IIFA साठी निघाली होती दुबईला

मिताली आणि सिद्धार्थ एकत्र करत असलेल्या रिल्सवर सुद्धा चाहत्यांच्या खूप कमेंट्स असतात. सिद्धार्थ मितालीसोबत मजेदार रिल्स करून पोट धरून हसायला भाग पाडतो. तिची मजा करण्याची तो एकही संधी सोडत नाही. त्यांनी मागे भांडण करताना एक रील शेअर केलेलं ज्यात फॅन्सना खरोखरचं दोघे एवढी भांडणं करतात का अशी शंका आली होती. पण दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे दिसून येतं.

सिद्धार्थ मितालीने नुकतंच स्वतःचं घर घेतलं. सिद्धार्थ सध्या निवेदकाच्या भूमिकेत दिसला होता तर मिताली कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार यासाठी सगळे उत्सुक आहेत.

First published:

Tags: Marathi entertainment, Relationship, Siddharth chandekar