अंकिता लोखंडे ही अभिनेत्री चाहत्यांची बरीच लाडकी आहे. ही अभिनेत्री तिच्या नव्या लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंकिताने बेज रंगाचा एक ओव्हरसाईझ आऊटफिट परिधान केला आहे. या आऊटफिटमध्ये तिने काही फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे अंकिताला बरंच ट्रोल केलं जात आहे. तिच्या फोटोवर काही जणांनी कमेंट करून “काय ग हे गोणपाट घातलीस काय पावसाळ्यात” असं लिहिलं आहे. तर एका युजरने “गोधडी गुंडाळली ” असं लिहीत तिच्या या लुकची खिल्ली उडवली आहे. तर या उलट काही चाहत्यांकडून तिला या लुकसाठी बऱ्याच कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळताना दिसत आहेत. अंकिता आणि तिचा नवरा विकी जैन यांच्या लग्नाला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले. ज्याचं छानसं सेलिब्रेशनसुद्धा दोघांनी केल्याचं दिसून आलं होतं. अंकिताचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. पण सध्या तिच्या आऊटफिटमुळे तिला ट्रोलिंग सहन करावं लागत आहे.