Home /News /entertainment /

अभिनेत्री श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली; रुग्णलयात केलं दाखल

अभिनेत्री श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली; रुग्णलयात केलं दाखल

श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. म्हणूनच तिच्या रुग्णालयात दाखल होण्याची माहिती मिळताच, चाहते तिची चिंता करू लागले आहेत.

    मुंबई, 30सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री (Tv Actress) श्वेता तिवारी(Shweta Tiwari) गेली अनेक दिवस सातत्याने विविध शो करत आहे. त्यामुळे तिचं शेड्युल खूपच बिझी होतं. त्यामुळे अचानक अभिनेत्रीची तब्बेत बिघडली आहे. या कारणास्तव तिला रुग्णालयात दाखल करण्यात(Hospitalised) आलं आहे. सध्या सुरु आहेत. नुकताच श्वेता स्टंटवर आधारित शो 'खतरों के खिलाडी ११' मध्ये सहभागी झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, श्वेता लवकरच बिग बॉस १५ मध्ये सिनिअर स्पर्धक म्हणून दिसून येणार आहे. श्वेता तिवारीच्या टीमने सांगितलं, ती आता चांगल्या पद्धतीने रिकव्हरी करत आहे. तिला अशक्तपणा आणि रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज तकच्या वृत्तानुसार, श्वेता तिवारीच्या टीमने म्हटलं आहे, 'आम्हाला कालपासून असंख्य फोन येत आहेत. सर्वलोक श्वेता तिवारीच्या तब्बेतीबद्दल जाणून घेऊ इच्छित आहेत. सर्वांना सांगू इच्छितो, त्यांची प्रकृती आत्ता स्थिर आहे. त्यांना कमी रक्तदाब आणि अशक्तपणा यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्या गेली अनेक दिवस विविध शोमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचंड प्रवास झाला आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या तब्बेतीवर हा परिणाम झाला आहे. या सर्व कारणामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. (हे वाचा:Samantha Akkineni खरंच मुंबईला शिफ्ट होणार? अभिनेत्रीने लाइव्ह येत दिलं उत्तर) श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. म्हणूनच तिच्या रुग्णालयात दाखल होण्याची माहिती मिळताच, चाहते तिची चिंता करू लागले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. श्वेता तिवारीच्या टीमने तिच्या सर्व चाहत्यांचं तसेच तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व लोकांचं आभार मानलं आहे. सध्या तिची प्रकृती ठीक आहे. ती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तिला काही दिवसात रुग्णालयातून घरी पाठवण्यात येईल. (हे वाचा:तुझ्याकडून ही अपेक्षा...'अंडरवेअरच्या जाहिरातीत Rashmika Mandannaला पाहून भडकल) श्वेता तिवारीने मोठ्या कष्टाने मनोरंजनसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. तिने अनेक उत्कृष्ट मालिका दिल्या आहेत. ती सर्वात जास्त यशस्वी अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. श्वेता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आपली अपडेट्स देत असते. नुकताच श्वेता तिवारी खतरों के खिलाडी ११ या रोहित शेट्टीच्या कार्यक्रमात धम्माल करताना दिसून आली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Shweta tiwari

    पुढील बातम्या