मुंबई, 28 सप्टेंबर- नॅशनल क्रश**(National Crush)** म्हणून अभिनेत्री रश्मिका मंदनाला (Rashmika Mandanna) ओळखलं जातं. साऊथ अभिनेत्री रश्मिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती आपल्या चित्रपटामुळे नव्हे तर अभिनेता विकी कौशलसोबत शूट केलेल्या जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. ही जाहिरात एका कंपनीच्या अंडरविअरची आहे. यामध्ये रश्मिका अभिनेत्याच्या या अंडरगगारमेंटवर फिदा झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. ही जाहिरात पाहून लोक मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीवर टीका करत आहेत, इतकंच नव्हे तर आपल्याला नॅशनल क्रशकडून ही अपेक्षा नसल्याचंही म्हटलं आहे.
@vickykaushal09 @iamRashmika what kind of add is this ??? Do you think this was funny ???
— Warrior King (@hellraiser008) September 27, 2021
@MensDayOutIndia @Ambar_MRA @PriyaScifi https://t.co/3CtMUjJu6S
काय आहे नेमकी जाहिरात- या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं आहे, एक योगा सेशन सुरु असत. यावेळी योग करतांना विकी कौशलची अंडरगारमेंटची स्ट्रीप रश्मिकाला दिसते. ते पाहून अभिनेत्री रोमँटिक होते. त्यानंतर पुन्हा ते पाहण्यासाठी अभिनेत्री प्लॅन बनवते. अशा आशयाची ही जाहिरात आहे. पूर्ण जाहिरात पाहून लोक भडकले आहेत. तसेच नेटकरी सोशल मीडियावर अभिनेत्रीला खडे बोल सुनावत आहेत. तसेच नॅशनल क्रशकडून तर ही अपेक्षा नव्हती असंदेखील म्हटलं जात आहे.
तर एका चाहतीने ट्विट करत लिहिलं आहे, ‘रश्मिका मंदना मी तुमची जाहिरात पाहिली, मी खूपच निराश झाले. मला तुमच्याकडून अजिबात अशी अपेक्षा नव्हती. तुम्हाला भान ठेवायला हवं तुम्ही एक नॅशनल क्रश आहेत. लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतात.त्यामुळे तुम्हाला भान ठेवायला हवं’.
तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे, ‘हे खूपच स्वस्त आहे. मी हे खूप वेळा पाहिलंय, तर आणखी एकाने म्हटलं आहे, ‘रश्मिकासारख्या मुली इतर मुलींवर चुकीचा प्रभाव टाकत आहेत’. असे अनेक ट्विट करून अभिनेत्रीवर निशाणा साधला जात आहे.
National crush of India Rashmika mandana with Vicky Kaushal in adv of Amul Macho.
— Suhani (@3_suhani) September 28, 2021
Now don't ask about the moral values,ethics,principles,etiquettes and upbringing,its all about money 💰#woke_feminism #comouflage
वर्क फ्रंटबदल सांगायचं झालं तर, विकी कौशल सरदार उधम, साम बहादूर, मिस्टर लेलेसोबत इतरही चित्रपटात झळकणार आहे. तर दुसरीकडे मंदना अल्लू अर्जुनसोबत पुष्पामध्ये झळकणार आहे. इतकंच नव्हे तर ती बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू आणि अमिताभ बच्चन सोबत गुड बायमध्ये दिसणार आहे.