मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Samantha Akkineni खरंच मुंबईला शिफ्ट होणार? अभिनेत्रीने लाइव्ह येत दिलं उत्तर

Samantha Akkineni खरंच मुंबईला शिफ्ट होणार? अभिनेत्रीने लाइव्ह येत दिलं उत्तर

गेली अनेक दिवस सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा होत आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघे एकमेकांपासून विभक्त राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.

गेली अनेक दिवस सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा होत आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघे एकमेकांपासून विभक्त राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.

गेली अनेक दिवस सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा होत आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघे एकमेकांपासून विभक्त राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.

मुंबई, 29 सप्टेंबर- साऊथची (South) फेमस जोडी समंथा अक्खीनेनी(Samantha Akkineni ) आणि नागा चैतन्या(Naga Chaitnya) यांच्यामध्ये गेली अनेक दिवस खटके उडत असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी असं म्हटलं जात होतं की समंथा नागा चैतन्यचा घर सोडून आपल्या वडिलांच्या घरी शिफ्ट झाली आहे. त्यांनतर म्हटलं गेलं की ती आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू इच्छिते त्यासाठी ती मुंबईमध्ये शिफ्ट होत आहे. या सर्व चर्चांच्या दरम्यान अभिनेत्रीने लाइव्ह येत आपली बाजू मांडली आहे.

लाइव्हमध्ये काय म्हणाली समंथा-

नुकताच अभिनेत्री समंथा अक्खीनेनीने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. यावेळी समंथाने आपल्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेदेखील दिली आहेत. यावेळी एका चाहत्याने समंथाला तिच्या मुंबई शिफ्ट होण्याबद्दल प्रश्न केला होता. त्याला उत्तर देत समंथाने म्हटलं, 'मला माहिती नाही माझ्याबद्दल इतक्या अफवा का पसरत आहेत. आणि कुठून पसरत आहेत. १००० अफवा पसरल्या असतील आमच्याबाबतीत. पण मी सांगू इच्छिते हैद्राबाद माझं घर आहे. हैद्राबादने मला भरपूर काही दिलं आहे. आणि यापुढेही मला इथेच आनंदाने राहायला आवडेल'. यावरून समंथा मुंबई शिफ्ट होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

(हे वाचा:तुझ्याकडून ही अपेक्षा...'अंडरवेअरच्या जाहिरातीत Rashmika Mandannaला पाहून भडकल )

गेली अनेक दिवस सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा होत आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघे एकमेकांपासून विभक्त राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. समंथा आणि नागा चैतन्य दोघेही साऊथमध्ये खूपच प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांचा चाहतावर्गदेखील फार मोठा आहे. त्यामुळे अशा चर्चांमुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. नागा आणि समंथाने ४ वर्षांपूर्वी गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.

(हे वाचा:बायकोकडे लक्ष दे' म्हणणाऱ्या Trollers ला रितेश देशमुखने दिलं सडेतोड उत्तर)

नागा आणि समंथाच्या विभक्त होण्याच्या चर्चांना तेव्हा जोर चढला जेव्हा सामंथाने इन्स्टाग्रामवरून आपल्या नावासमोरून आक्खीनेनी काढलं होतं. या प्रकारामुळे समंथा आणि नागामध्ये खरंच काही तरी बिघडल्याचं आणि त्यांचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.

First published:
top videos

    Tags: Entertainment, South actress