नवी दिल्ली, 30 जानेवारी: टीव्ही अभिनेत्री (TV Actress) श्वेता तिवारी (Actress Shweta Tiwari) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत (Shweta Tiwari In Controversy) आली आहे. अनेकांनी श्वेतावर प्रचंड कठोर शब्दांत टीका केली आहे. श्वेताने माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असं वक्तव्य करत सर्वांचा रोष ओढवून घेतला आहे. दरम्यान आता अभिनेत्रीने यासंदर्भात माफी मागत ‘माझ्या वक्तव्याचा गैरवापर करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिने आपल्या वक्तव्यावर भाष्य केले. , ‘माझ्या लक्षात आले आहे की माझ्या एका सहकाऱ्याशी संबंधित माझ्या वक्तव्याचा हवाला देत विपर्यास करून ते मांडले गेले आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. व्हिडिओ नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की सौरभ राज जैन यांनी साकारलेल्या देवाच्या लोकप्रिय पात्रासाठी मी ‘देव’ हा शब्द वापरला आहे. लोक अनेकदा एखाद्या अभिनेत्याचे नाव त्याच्या पात्राशी जोडतात आणि अशा परिस्थितीत मी माध्यमांशी संवाद साधताना हेच उदाहरण वापरुन बोलले होते. पण माझ्या वक्तव्याचा गैरवापर करण्यात आला. हे खूपच खेदजनक आहे. माझी देवावर खूप श्रद्धा आहे आणि एक भक्त म्हणून माझ्याकडून जाणूनबुजून किंवा इतर कोणत्याही प्रकारे असा प्रकार होणे शक्य नाही. तसंच, नकळत एखाद्याच्या भावना दुखावण्याचे कृत्य मी करणार नाही.’ असे स्पष्टीकरण तिने आपल्या व्हायरल झालेल्या वक्तव्यावर दिले. ‘ब्रा’च्या साईजचं थेट देवासोबत कनेक्शन जोडणं श्वेता तिवारीला भोवलं; आता पोलिसांत पोहोचलं प्रकरण अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतंच आपल्या आगामी ‘शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर’ या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळला गेली होती. या कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला. यावेळी श्वेता तिवारीने ‘माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्रीचं हे वक्तव्य समोर येताच सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. इतकंच नव्हे तर श्वेताच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे. श्वेता पूर्वी भोपाळमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमाचा होस्ट सलील आचार्य याने त्याचं स्पष्टीकरण दिले होते. ‘श्वेता तिवारीच्या एका विधानावर गोंधळ होत आहे. परंतु त्यामध्ये थोडा गैरसमज होत आहे. असे सांगता, यावेळी आमच्यासोबत अभिनेता सौरभ जैनसुद्धा होता. सौरभने अनेक पौराणिक भूमिका साकारल्या आहेत. त्याने अनेक मालिकांमध्ये देवाच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे मी त्याला प्रश्न विचारला होता देवाच्या भूमिकेपासून सरळ ब्रा फिटरची भूमिका? यावरच बोलताना श्वेता म्हणाली होती हा याच देवाकडून आम्ही फिटिंग करून घेत आहोत’. श्वेताचं वक्तव्य पूर्णपणे समजून घ्या त्याचा विपर्यास करु नका असे आवाहन सलीला यांनी केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.