मुंबई, 28 जानेवारी- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी
(Shweta Tiwari) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेत्रीने देवाच्या बाबतीत केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. आता अभिनेत्रीच्या अडचणीत आणखी वाढ झालेलं दिसून येत आहे. श्वेता तिवारीने केलेल्या या वक्तव्याचा निषेध करत अभिनेत्रीवर एफआयआर दाखल केली आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारीवर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करतकलम 295A अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. श्वेता तिवारीचं हे वक्तव्य समोर येताच हिंदू संघटना अभिनेत्रीचा कडाडून विरोध करत आहेत. इतकंच नव्हे तर हे प्रकरण मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचलं आहे. श्वेता तिवारी आणि या वेबसीरीजच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली जात आहे. श्वेता तिवारीने सार्वजनिक पद्धतीने या प्रकरणावर माफी मागावी तिने जर माफी नाही मागितली तर या वेबसीरीजचं शूटिंग भोपाळमध्ये होऊ देणार नाही असा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतंच आपल्या आगामी 'शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर' या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळला गेली होती. या कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला. यावेळी श्वेता तिवारीने 'माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..' असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्रीचं हे वक्तव्य समोर येताच सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. इतकंच नव्हे तर श्वेताच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे.
(हे वाचा: श्वेता तिवारीने का केलं होतं खळबळजनक वक्तव्य? झाला मोठा खुलासा)
मीडिया रिपोर्टनुसार, 'शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर' या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळला गेली होती. यावेळी तिच्या सोबत अभिनेता सौरभ जैनसुद्धा होता. सौरभने अनेक पौराणिक भूमिका साकारल्या आहेत. त्याने अनेक मालिकांमध्ये देवाच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्याला प्रश्न विचारण्यात आला होता देवाच्या भूमिकेपासून सरळ ब्रा फिटरची भूमिका? यावरच बोलताना श्वेता म्हणाली होती हा याच देवाकडून आम्ही फिटिंग करून घेत आहोत'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.