मुंबई, 30 ऑगस्ट: टीम इंडियाचा युवा क्रिकेटर शुभमन गिल मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या दमदार कामगिरीमुळे चर्चेत आहे. शुभमन वैयक्तिक आणि प्रोफेशनल अशा दोन्ही कारणांमुळे चर्चेत आलाय. एकीकडे वेस्टइंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील सीरिजमध्ये शुभमन चांगलाच चमकला. मात्र त्यानंतर त्याच्या आणि सारा तेंडूलकर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा समोर आल्या. त्या चर्चा संपत नाही तर तोवर शुभमनचा आणखी एक फोटो समोर आला ज्यानं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली.
शुभमन सारा तेंडूलकरबरोबर रिलेशनमध्ये असल्याच्या होत्या. पण दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यानं त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान सारा तेंडूलकर नंतर शुभमन अभिनेत्री सारा अली खानबरोबर डेट करत असल्याच्या चर्चा समोर आल्या. दोघांच्या डेटींगचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दोघांचे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांची त्याची चांगलीच मज्जा उडवली आहे. शुभमनला ट्रोल करत भन्नाट मीम्सचा वर्षाव केला आहे. त्यातील काही निवडक मीम्स जे पाहून तुम्ही लोटपोट व्हाल.
Shubman gill's obsession with the name Sara>>>>> 😭😭 pic.twitter.com/lIncmy4RCf
— Harshit (@imharshit05) August 29, 2022
*Girl named Sara exists*
Shubman Gill: pic.twitter.com/wvNZYfb1DO — Sagar (@sagarcasm) August 30, 2022
सोशल मीडियावर साराअली खान आणि शुभमनचे फोटो शेअर करत त्यावर जबरदस्त मीम्स बनवलेत. एका मीमवर लिहिलंय, सारा तो सारा होवे हे, भले ही तेंडूलकर असो किंवा खान. हे मीम नेटकऱ्यांची चांगलेच व्हायरल केले आहेत. पाहा आणखी काही पोट धरून हसायला लावणारे मीम्स.
Any girl with sara name exists
Le shubman gill pic.twitter.com/g5acWRNWf0 — pant pan (@pant_fann) August 29, 2022
Shubman gill spotted 👀 with Sara Ali Khan in Dubai . pic.twitter.com/hPxlZtBEsw
— Manoj Pareek (@mrpareekji) August 29, 2022
Shubman Gill dating Sara ali khan is something that shouldn't have happened 😕😔 . #Shubmangill pic.twitter.com/GGq6TP1wl8
— azad 7.7.81 (@AzadNazrana) August 30, 2022
सारा तेंडूलकर आणि शुभमन गिल यांना 2019मध्ये पहिल्यांदा ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट्स, लाईक्स करताना दिसायचे. पण या सगळ्यात सारा अली खानची चर्चा कुठेच नव्हती. अचानक शुभमन सारा अली खानला भेटायला गेल्यानं सगळेच अवाक झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Sport