मुंबई,7ऑक्टोबर- दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha) आणि अभिनेता नागा चैतन्य अक्किनेनी (Naga Chaitanya) यांचं जोडपं टॉलीवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. ही जोडी अनेक चाहत्यांची लाडकी आहे. आठ वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी लगीनगाठ बांधली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही जोडी वेगळ्याचं कारणासाठी चर्चेत आहे. नागा चैतन्य आणि समंथा या जोडप्यानं गेल्या आठवड्यात विभक्त होण्याची घोषणा केली. तेव्हापासून सोशल मीडियावर या जोडीच्या घटस्फोटाची (Divorce) जोरदार चर्चा आहे. दोघांनी घटस्फोट का घेतला असावा, याबाबत अनेक कारणं सोशल मीडियावर चर्चिली जात आहेत. समंथाचा स्टायलिस्ट आणि मित्र प्रीतम जुकलकर हा या जोडीच्या विभक्त होण्यासाठी कारणीभूत असल्याचं वृत्त कोईमोई डॉटकॉमनं दिलं आहे.
अनेक दिवस सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाच्या बातम्या फिरत होत्या. सुरुवातीला ही फक्त चर्चा असल्याचं वाटत होतं. मात्र, गेल्या आठवड्यात दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर पुन्हा घटस्फोटाच्या कारणांची चर्चा रंगली. अपत्याला जन्म देण्यापासून ते समंथानं चित्रपटांत बोल्ड सीन (Bold scene) देऊ नयेत इथपर्यंत अनेक विषयांबाबत अक्किनेनी कुटुंबीयांनी (Akkineni family) आक्षेप घेतले होते. या जोडप्याच्या अनेक खासगी बाबींतही अक्किनेनी कुटुंबीय नाक खुपसत होतं अशाही चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यामध्ये आता आणखी एका नवीन कारणाची भर पडली आहे. (**हे वाचा:** अखेर समंथा आणि नागा चैतन्यने घेतला घटस्फोटचा निर्णय! अभिनेत्रीने … ) समंथाचा स्टायलिस्ट आणि मित्र प्रीतम जुकलकर (Preetham Jukalker) यांच्यातील वाढती जवळीक हे नागा चैतन्य आणि समंथाच्या विभक्त होण्यामागील एक कारण असल्याचं बोललं जात आहे. प्रीतम आणि सॅम दोघेही चांगले मित्र आहेत आणि सोशल मीडियावर असलेल्या फोटोंमधून त्यांची जवळीक वेळोवेळी दिसलीही आहे. काही काळापूर्वी, प्रीतम जुकलकरनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. संमथाच्या सासरची मंडळी तिचा छळ करत असल्याच्या आशयाची ती पोस्ट होती. नंतर ती हटवण्यात आली. मात्र, त्यापूर्वीचं अनेकांनी ती वाचल्यानं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.नागा चैतन्य आणि समंथा या सुपरस्टार जोडप्याच्या विभक्त होण्याची बरीच कारणं सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यावर चर्चा देखील होत आहेत. परंतु, अद्याप दोघांनी यातील एकाही कारणाला दुजोरा दिलेला नाही.