बॉलिवूडमध्ये का मिळत नाही काम? श्रेयस तळपदेनं केला धक्कदायक खुलासा

बॉलिवूडमध्ये का मिळत नाही काम? श्रेयस तळपदेनं केला धक्कदायक खुलासा

कुठल्याही वादग्रस्त प्रकरणात न अडकलेला श्रेयला सध्या कामाच्या शोधात आहे. पण या अष्टपैलू अभिनेत्याच्या बाबतीत असं का घडलं?

  • Share this:

मुंबई 16 मे : श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा मराठी मनोरंजन सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. मराठी नाटकं आणि चित्रपट गाजवणाऱ्या श्रेयसनं बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाचं प्रदर्शन केलं आहे. ‘पछाडलेला’, ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेला श्रेयस कधीकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. समिक्षक आणि प्रेक्षक त्याच्या अभिनय शैलीचं तोंड भरुन कौतुक करत होते. मात्र पाहता पाहता त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. विशेष म्हणजे कुठल्याही वादग्रस्त प्रकरणात न अडकलेला श्रेयला सध्या कामाच्या शोधात आहे. पण या अष्टपैलू अभिनेत्याच्या बाबतीत असं का घडलं?

श्रेयसनं नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं त्याला चित्रपट न मिळण्याचं कारणही सांगितलं. तो म्हणाला, “त्याला स्वत:चं मार्केटिंग करणं कधी जमलं नाही. एखादं ऑडिशन द्यावं... तो रोल मिळवण्यासाठी प्रयत्न करावा... रोल मिळाल्यास प्रमाणिकपणे काम करावं... अन् त्यानंतर दुसरा एखादा प्रोजेक्ट शोधावा अशा पद्धतीनं आजवर मी माझ्या करिअरकडे पाहिलं. अनेक कलाकार काहीही काम करत नाही तरी देखील चर्चेत असतात. माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही कारण मी स्वत:चं कधी मार्केटिंग केलंच नाही. माझा माझ्य कामावर जास्त विश्वास होता पण आज तुमच्या अभिनयापेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्व आलंय. त्यामुळंच अभिनय करता न येणारे कित्येक कलाकार तुम्हाला बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकताना दिसतात.”

राधेला बसला ट्रोलर्सचा दणका; सलमानला मिळालं करिअरमधील सर्वात कमी रेटिंग

“मार्केटिंग मला जमली नाहीच पण ज्या मित्रांवर विश्वास होता त्यांची देखील मला फसवलं. मला असं कळालंय की काही अभिनेते माझ्यासोबत स्क्रीन शेअर करणं असुरक्षित समजतात. त्यामुळे मी त्यांच्या चित्रपटात नसावं असं त्यांना वाटतं. काही मित्रांच्या हितासाठी मी काही चित्रपट केले आहेत. मात्र त्याच मित्रांनी माझ्या पाठीत सुरा खुपसला. माझे काही असेही मित्र आहेत जे पुढे निघून गेले आहेत आणि आता चित्रपट बनवत आहेत. इंडस्ट्रीमध्ये 90 टक्के लोक तुमच्या ओळखीचे असतात आणि फक्त 10 लोक असे असतात ते तुमच्या चांगल्या कामावर मनापासून खुश  होतात.” अशी खंत श्रेयसनं या मुलाखतीत व्यक्त केली.

Published by: Mandar Gurav
First published: May 16, 2021, 4:20 PM IST

ताज्या बातम्या